भुसावळ रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार उदघाटन 

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क 

अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील विविध रेल्वेस्थानकांचे रुपडे पालटणार आहे. त्यात पहिल्याच टप्प्यात भुसावळ विभागातील सहा रेल्वेस्थानकाच्या विकासकामांचे भूमिपूजन रविवारी दि. ६ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून करणार आहे.

यासाठी सुमारे १८० कोटी खर्च येणार असून, यात लँडस्केपसह प्रवाशांना विविध सिविधा देऊन स्थानकाचे संपूर्ण लुक बदलविला जाईल, अशी माहिती रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक इती पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

काय म्हणाल्या श्रीमती पांडे?

श्रीमती पांडे म्हणाल्या, की पंतप्रधान मोदी यांचे भविष्यातील भारतीय रेल्वेसंदर्भात एक मोठा व्हिजन आहे. त्याचाच एक भाग म्हणून अमृत भारत स्टेशन योजनेसाठी (Bharat Station Scheme) देशातील एक हजार ३०९ स्थानकांची निवड करण्यात आली आहे. यात मध्य रेल्वेच्या ७६ स्थानकांचा समावेश आहे. तर भुसावळ रेल्वे विभागाच्या १५ स्थानकांचा समावेश आहे.

मात्र, पहिल्या टप्प्यात मनमाड, शेगाव, मलकापूर, नेपानगर, चाळीसगाव, यासह स्थानकांचा समावेश आहे. विकासकामांचे भूमिपूजन प्रांतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाइन उपस्थिती दर्शवणार आहे. या संदर्भात मनमाड रेल्वेस्थानकावर विभागाचा मुख्य कार्यक्रम होणार असून, त्यासाठी मंत्री डॉ. भारती पवार, पालकमंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे यांची प्रमुख उपस्थिती असेल.

रविवारी सकाळी अकराच्या सुमारास होणाऱ्या या सोहळ्यानिमित्त मनमाड रेल्वेस्थानकावर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पांडे म्हणाल्या, की रेल्वेच्या आधुनिकीकरणात आपला सांस्कृतिक वारसा जपून सुशोभीकरण होईल. त्यात प्रवासी सुविधेला प्रथम प्राधान्य असणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.