चोपड्यातुन १५ वर्षाच्या मुलाला पळविले

0

चोपडा ;– शहरातील एका भागात राहणाऱ्या १५ वर्षीय मुलाला कुणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना ५ रोजी घडली असून याप्रकरणी चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि शहरातील गांधी चौक परिसरात राहणार १५ वर्षीय मुलगा हा ५ जानेवारी रोजी दुपारी भाई कोतवाल रस्त्याने घरी जात असताना त्याला कुणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली . त्याचा सर्वत्र शोध घेतला असता तो न मिळून आल्याने ६ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता त्याच्या वडिलांनी चोपडा शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सपोनि संतोष चव्हाण करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.