हॉटेलची खिडकी तोडून रोकड व डीव्हीआर लांबविला

0

चोपडा;- शहरातील कारगिल चौकातील एमआयडीसी कॉम्प्लेक्स मधील हॉटेल भाऊ च्या खिडकी तोडून आत प्रवेश करून अभ्यास चोरट्यांनी रोकड आणि डीव्हीआर मशीन चोरून नेल्याचा प्रकार ८ ते ९ रोजी दरम्यान घडला असून याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, प्रशांत आत्माराम म्हाळके हे हॉटेल व्यावसायिक असून त्यांचे कारगिल चौकात एमआयडीसी कॉम्प्लेक्स मध्ये भाऊ नावाचे हॉटेल असून या हॉटेलची खिडकी तोडून वीस हजार पाचशे रुपये रोकड आणि पंधरा हजार रुपये किमतीचा डीव्हीआर मशीन लंबविल्याचा प्रकार नऊ रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास उघडकीस आला. याप्रकरणी प्रशांत माळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास संदीप भोई करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.