गोड साखरेची कडू कहाणी …

0

बेलगंगा साखर कारखान्यांची झाली हानी, आजी माजी संचालक बिनधास्त !

एम.बी. पाटील ,लोकशाही न्यूज नेटवर्क

चाळीसगाव ;- चाळीसगांव तालुक्यात बेलगंगा साखर कारखान्याच्या माध्यमातून एकेकाळी संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्यातील काही तालुक्यात सुभत्ता नांदत होती सर्वत्र सुगीचे दिवस होते तालुक्याला संजीवनी देणारा ह्या बेलगंगा साखर कारखान्यांची आज पूर्ण वाट लागली आहे .तालुक्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात ,ऊस तोड मजुर तालुक्यात मोठ्या प्रमाणात असून आपला हक्काचा साखर कारखाना सुरू होऊ शकला नाही दसऱ्याला सुरू होईल दिवाळीला सुरू होईल, या आशेने ऊस उत्पादक शेतकरी वाट पाहत होते .परंतु दसरा गेला , दिवाळी गेली कारखान्यांची चक्र काही फिरली नाही, कारखान्यावर अवलंबून असणारे सर्व घटक आशेने वाट पाहून होते परंतु दिवाळी गेली ,दसरा गेला आशाची निराशा झाली .कारखान्याचा गोड धूर तर निघालाच नाही, एके काळी माजी मंत्री अण्णासाहेब एम के पाटील यांच्या कार्यकाळात तालुक्यात कारखान्याच्या माध्यमातून सुबत्ता नांदत होती, रीकवरी कमी असताना सुद्धा ऊस उत्पादकांना योग्य भाव मिळत होता.

चाळीसगावचा बेलगंगा साखर कारखाना हा महाराष्ट्रात नावारूपाला होता एम के अण्णा पाटील यांच्या कार्यकाळात सर्वदूर नावारूपाला होता, या बेलगंगा साखर कारखान्यांचे आजची परिस्थिती म्हणजे गोड साखरेची कडू कहाणी असेच म्हणावे लागेल . पूर्ण महाराष्ट्रात नावाजलेला ह्या साखर कारखान्याचीआज पूर्ण वाट लागली आहे . गेल्या १०/१२ वर्षापासून कारखाना ऑक्सीजनवर होता, मधल्या काळात अंबाजी ग्रुपच्या संचालक मंडळाने कसाबसा काही दिवस चालवला पुढे सुरू राहील असं वाटलं होतं, परंतु आज कारखान्याच पूर्ण दिवाळ निघालं आहे, येथील मजूर देशोधडीला लागले आहेत.

चाळीसगाव तालुक्यातील ऊस तोड मजुरांना काम नाही, राज्यातील इतर कारखान्याकडे आपल्या पोटाची खडगी भरण्यासाठी बायका मुलांसह पर प्रांतात ऊस तोडणी साठी रवाना झाले आहेत ,मजुरांची दिवाळी दसरा हे सण सुंध्दा राज्यातील इतर कारखान्याकडे गेली आपल्या पोटाची खडगी भरण्यासाठी मुला बाळांना व घरदार सोडून इतर कारखान्याकडे दिवाळी दसरा हे सण गेले परंतु हक्काचा बेलगंगा साखर कारखाना सुरू होऊ शकला नाही,कारखान्याच्या जीवावरअनेक राजकीय म़डळींनी आपली पोळी भाजली सत्ता भोगली आज सर्व आजी-माजी संचालक राजकीय पुढारी त्या बाबतीत गप्प आहेत . कारखान्याच्या बाबतीत एक शब्द बोलायला तयार नाही अनेकांनी कारखान्याच्या जिवावर मजा मारली कारखान्याच्या पैशावर इतर संस्थांवर गेले तेथेही मजाच मारली, अशी सर्व राजकीय मंडळी आज कारखान्या बद्दल एक शब्द बोलायला तयार नाही ,सध्या स्थितीला कारखान्याला कुलूप लागले आहे कारखान्यांची इतर मालमत्ता जिल्हा बँकेच्या ताब्यात व प्रा. फंड विभागाचे कुलूप लागले आहे .

या दोन्ही विभागाच्या ताब्यात आज कारखाना आहे जिल्हा बँकेचे कुलूप उघडल्याशिवाय कारखाना सुरू होणार नाही हे सत्य आहे कर्मचाऱ्यांचे आज अतोनात हाल होऊन देशोधडीला लागले आहेत.  बेलगंगा साखर कारखाना हा चाळीसगाव तालुक्यात नव्हे तर महाराष्ट्रात नावारूपाला होता तत्कालीन चेअरमन माजी केंद्रीय मंत्री अण्णासाहेब एम. के. पाटील यांनी कारखान्याचे धुरा गेल्या पंधरा वर्षे अत्यंत चांगल्या प्रकारे सांभाळली.  त्यांच्या कार्य काळात चाळीसगाव तालुक्यात कारखान्याच्या रूपाने सुबत्ता नांदत होती गोड साखरेचा धूर चाळीसगाव तालुक्यातच नव्हे तर चार जिल्ह्याच्या सीमेवर धुमसत होता.  ऊस उत्पादक शेतकरी व कामगार बांधव आनंदीत असायचा तर कारखान्याच्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळात होता.

परंतु आज त्या कारखान्याकडे कोनीही ढुंकूनही पाहत नाही स्वर्गीय रामराव जिभाऊ पाटील यांचे स्वप्न धुळीला मिळाल्याचं चित्र दिसत आहे.  तालुक्यातील राजकीय पुढाऱ्यांनी साखर कारखाना सर्वांनीआळीपाळीने धुतला.  त्यात आजी माझी संचालक चेअरमन व्हाइस चेअरमन व त्यांचे सर्व नातेवाईक यांनी धुमाकूळ घातला होता.  आज हीच मंडळी कारखान्याकडे ढूंकूनही पहात नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल.  आज चाळीसगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी तालुका दुष्काळी म्हणून शासन दरबारी पाठपुरावा करून जाहीर केला.  तालुक्यातील विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला.  त्या माध्यमातून अनेकांचा रोजगारांचा प्रश्न सुटणार आहे,.  उद्योग धंदे सुरू होऊन मजुरांना काम धंदा मिळनार आहे.  परंतु हक्काचा कारखाना सोडून ऊस उत्पादकांना आपला ऊस इतर कारखान्याकडे नाईलाजाने द्यावा लागतआहे हे एक दूरदैव म्हणावे लागेल आज कारखाना सुरू राहिला असता तर तालुक्यात सुगीचे दिवस आले असते . माजी मंत्री एम के अण्णा पाटील यांच्या ताब्यातून कारखाना गेला तेव्हापासून कारखान्याला घरघरच लागली होती आज तर पूर्ण वाटोळे झालेले दिसत आहे ,.

Leave A Reply

Your email address will not be published.