मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तेच शासकीय महापूजा..

0

 

पंढरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क ;

मुख्यमंत्र्यांच्या सहा कार्यक्रमांना या तीन अटींसह निवडणूक आयोगाकडून परवानगी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पंढरपूर दौऱ्याला निवडणूक आयोगाने हिरवा कंदील दाखवला असून. आषाढी एकादशीला विठ्ठलाची महापूजा ही एकनाथ शिंदेंच्या हस्तेच होणार हे निश्चित झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी पहाटे विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडणार आहे. आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूर दौऱ्यावर येत आहेत. मात्र, राज्यात नगरपालिका निवडणूक जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू झाली असून मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी जिल्हा प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली होती. त्या विनंतीली निवडणूक आयोगाने परवानगी दिलीये.

पूर्वनियोजित शासकीय कार्यक्रमांमध्ये कोणत्याही निधी विकास योजनेची घोषणा करू नये. वरील सर्व कार्यक्रमांसाठी आवश्यक त्या नियमानुसार परवानग्या घेण्यात याव्यात. कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यास हरकत नाही, पण त्या ठिकाणीही उपरोक्त अटींचे तंतोतंत पालन करण्यात यावे. या अटींसह पूजेसाठी तसेच कार्यक्रमांना परवानगी आयोगाने दिली आहे.

विश्रामगृह येथे पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी याचा समारोप सोहळा होणार आहे. एकादशीच्या दिवशी पहाटे शासकीय महापूजा झाल्यावर मुख्यमंत्री इस्कॉन आंतरराष्ट्रीय मंदिराचे भूमिपूजन करणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता सुंदर माझे कार्यालय, स्वच्छता दिंडी समारोप आणि दुपारी मुख्यमंत्री शिंदे हे शिवसेना पक्षाच्या मेळाव्यास हजेरी लावणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.