सोलापूर, विजापूर भागात भूकंपाचे सौम्य हादरे

0

सोलापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

आज सकाळच्या वेळी सोलापूर शहर व जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य स्वरूपाचे धक्के जाणवले असून या भूकंपाचा केंद्रबिंदू शेजारच्या कर्नाटकातील विजापूरजवळ असल्याची माहिती समोर आली आहे. विजापूर परिसरात झालेला भूकंप ४.६ रिश्टर स्केलपर्यंत नोंद करण्यात आलेला आहे. जिल्हा प्रशासनाने या घटनेस दुजोरा दिला आहे.

सोलापुरात काल दुपारपासून पावसाची रिपरीप चालू असून शनिवारी पहाटेही पावसाच्या सरी कोसळत होत्या. सकाळी ६.२२ वाजता काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. मंगळवेढा येथे भूकंपाचे धक्के जाणवल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले. विजापूरपासून १० किलोमीटर अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता.

Leave A Reply

Your email address will not be published.