स्व. रामभाऊ म्हाळगी यांची जयंती साजरी…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क ;

भारतीय जनता पार्टीचे नेते स्व. रामभाऊ म्हाळगी यांची आज दिनांक ९ जुलै रोजी दुपारी ४ वाजता भाजप कार्यालय वसंत स्मृति येथे प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून साजरी करण्यात आली. या दरम्यान आ. सुरेश भोळे (राजु मामा) सांगितले की स्व. रामभाऊ म्हाळगी हे उत्तम अभ्यासक,  विचारवंत होते. पक्षाचे कार्य त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे करून सत्ता नसताना पक्षासाठी तळागाळाच्या लोकांपर्यंत जाऊन पक्षाचे ध्येय व धोरण सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवले म्हणूनच आज मुंबई येथे त्यांच्या नावाने मोठी प्रबोधिनी आहे असे सांगितले.

या प्रसंगी जिल्हा सरचिटणीस सचिन पानपाटील, विशाल त्रिपाठी, महेश जोशी, तालुकाध्यक्ष गोपाळ भंगाळे, पंचायत समिती सदस्य विधीन चौधरी, युवा मोर्चाध्यक्ष भाऊसाहेब पाटील, आनंद सपकाळे, अमित देशपांडे, मिलिंद चौधरी, ललित बर्डे,अक्षय चौधरी, प्रकाश पंडित, गणेश माळी, प्रल्हाद सोनवणे, आदि. उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.