मोठा दिलासा.. कोरोनात पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांची फी माफ

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

कोरोनासारख्या भयंकर विषाणूने थैमान घातले होते. कोरोनामुळे (Corona) ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचं निधन झाले आहे अशा विद्यार्थ्यांना पदवी आणि पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंतचे संपूर्ण शुल्क माफ होणार आहे. अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (higher and technical Education Minister Chandrakant Patil ) यांनी केली आहे.

घोषणेमुळे मोठा दिलासा

“कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांच्या दोन्ही पालकांचे निधन झाले अशा विद्यार्थ्यांचे पदवी/पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंतचे संपूर्ण शुल्क माफ करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या विद्यार्थ्यांना या महत्त्वपूर्ण घोषणेमुळे फार मोठा दिलासा मिळेल, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

“चालू अभ्यासक्रमातील उर्वरित वर्षांचे संपूर्ण शुल्क माफ करण्यात आले आहे. यामध्ये पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा समावेश आहे. यासाठी दरवर्षी वेगळी घोषणा करण्याची आवश्यकता नाही, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

अनाथ मुला-मुलींना शिक्षण घेता यावे

कोरोना काळात अनेक विद्यार्थ्यांनी आपले पालक गमावले आहे. अशा अनेक अनाथ मुला-मुलींना शिक्षण घेता यावे यासाठी सरकारने संपूर्ण शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे दोन्ही पालक गमावलेल्या पदवी आणि पदविका शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंतची फी सरकार भरणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. आज विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात (Maharashtra Monsoon Assembly Session) चंद्रकांत पाटील यांनी याबाबतची घोषणा केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.