Saturday, January 28, 2023

वनधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

यावल पूर्व वन क्षेत्रातील डोंगर पठोरा परिमंडळातील पेंझरीपाडा कक्ष क्रमांक ८० मध्ये सकाळी जंगलात वनसंपतीचे रक्षणासाठी गेलेले वनक्षेत्रपाल व्ही. टी. पदमोर तसेच वनरक्षक गोवर्धन डोंगरे, जीवन नागरगोजे, कृष्णा शेळके व वन मंजूर इ. पथकासह कंम्पारमेंट ८० मध्ये सकाळी जंगल तपासणी अतिक्रमण, वृक्ष तोडीची पाहणी करीत असतांना संशयीत आरोपींना सुगावा लागल्याने सर्व वनकर्मचारी अधिकारी बेसावध असल्याचे पाहून संशयित आरोपींनी वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर शास्त्राने व लाठीकाठीने हल्ला करून जखमी केले आहे.

दरम्यान संशयित आरोपी फरार झालेले आहे. या हल्ल्यात जीवन नागरगोजे, वनरक्षक कृष्णा शेळके, वनरक्षक गोवर्धन डोंगरे वनरक्षक यांचेवर प्राण घातक हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये जीवन नागरगोजे वनरक्षक यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. गोवर्धन डोंगरे यांच्या डोक्यास जबर मार लागलेला आहे.

- Advertisement -

यावल व चोपडा हा जंगलाचा अतिसंवेदनशील भाग आहे. वन कर्मचारी अधिकारी यांचे रात्रंदिवस कर्तव्य असल्याने सदर वनकर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता जंगल संपती, वृक्षतोड, चोरटी तुट इ. संपत्तीचे रक्षण करीत असतांना त्याच्यावर सतत असे हल्ले होत राहिल्यास व आरोपींवर कठोर कारवाई न केल्यास वन कर्मचान्याचे मनोबल खच्चीकरण होवून त्यांच्या कर्तव्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकरता येत नाही.

संशयित आरोपींना  तात्काळ अटक करून लोक सेवकाला (वनकर्मचारी) त्यांचे कर्तव्यापासून प्रतिबंधित करणे, धाक दडपशाही करणे इ. नुसार भारतीय दंड संहिता १८६० कलम ३५३ अन्वये अजमीन पात्र गुन्हा नोंदवून आरोपीना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाने केली आहे.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे