मंदाकिनी खडसेंना हायकोर्टाचा दिलासा कायम

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसेंच्या (Eknath Khadse) पत्नी मंदाकिनी खडसे (Mandakini Khadse) यांना भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी (Pune Bhosari Land Scam) मुंबई उच्च न्यायालयाचा (Mumbai High Court) दिलेला दिलासा पुन्हा एकदा 16 सप्टेंबरपर्यंत कायम ठेवण्यात आला आहे.

पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी ईडीला मंदाकिनी खडसे चौकशीत पूर्ण सहकार्य करत आहेत. वेळोवेळी त्यांनी चौकशीसाठी हजेरी लावलेली आहे, अशी माहिती त्यांचे वकील मोहन टेकवडे यांनी कोर्टाला दिली, याची नोंद घेत हायकोर्टानं मंदाकिनी खडसेंना दिलेला अंतरिम दिलासा कायम ठेवला आहे. न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्यापुढे सोमवारी मंदाकिनी खडसे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली.

ईडीकडनं (ED) याप्रकरणी खडसे कुुटुंबियांविरोधात आरोपपत्र केलेलं आहे. या एक हजार पानी आरोपपत्रात एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्यासह तीन कंपन्यांचाही आरोपी म्हणून समावेश आहे. या सर्वांवर मनी लॉड्रिंगचा आरोप लावण्यात आला आहे. याप्रकरणी अटकेत असलेले खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांनी याप्रकरणी आपल्याला बळीचा बकरा बनवलं गेलंय, असा आरोप केला होता.

मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टानं (PMLA Court) चौधरींचा अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे भाजपासोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या एकनाथ खडसेंच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. साल 2016 मध्ये एकनाथ खडसे हे महसूल मंत्री असताना हा सारा व्यवहार झाला होता. विशेष म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत याची चौकशीही झाली होती, मात्र एसीबीनं खडसेंना क्लीन चीट दिलेली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.