चाळीसगाव माजी नगरसेवक गोळीबार प्रकरणी सात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल…

0

 

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

चाळीसगावचे माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे यांच्यावरील झालेल्या गोळीबार प्रकरणी रात्री उशिरापर्यंत शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये सात जणांविरुद्ध हत्येचा प्रयत्न आणि हत्येचा कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान

दरम्यान, आरोपींनी वापरलेली कार नागद – कन्नड रोडवर गौताळा घाटाच्या पायथ्याशी बेवारस सापडली आहे. कारमधून आलेल्या पाच जणांनी भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे यांच्यावर पूर्ववैमनस्यातून हा हल्ला केल्याची खळबळजनक घटना बुधवारी, ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास सिंधी कॉलनी परिसरात घडली होती. त्यात बाळू मोरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे.

गोळीबार प्रकरणी अजय संजय बैसाणे (21), रा. चाळीसगाव यांच्या फिर्यादीवरून वरून उद्धव उर्फ ​​गुड्डू शिंदे (रा. हिरापूर), सचिन गायकवाड (रा. चाळीसगाव), अनीस शेख उर्फ नव्वा शरीफ शेख (रा. हुडको कॉलनी, चाळीसगाव), सॅम चव्हाण (रा.हिरापूर), भूपेश सोनवणे (रा.चाळीसगाव), सुमित भोसले (रा.चाळीसगाव), संतोष निकुंभ उर्फ ​​सांता पहेलवान (रा.हिरापूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.