काय सांगता? जगातील असे शहर जिथे प्रत्येकाकडे आहे स्वतःचे विमान…(व्हिडीओ)

0

 

व्हायरल, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

आजकाल बाईक आणि कार अगदी कॉमन झाल्या आहेत. जवळपास प्रत्येकाकडे स्वतःचे काही वाहन असते. लोक त्यांची वाहने त्यांच्या घराच्या पार्किंगमध्ये किंवा जवळपासच्या पार्किंगमध्ये पार्क करतात. पण तुम्ही कधी अशा शहरात गेला आहात का जिथे तुम्ही लोकांच्या घराबाहेर एकही कार किंवा बाईक उभी केलेली नाही तर फक्त विमाने पाहिली आहेत? आश्चर्य वाटण्याची गरज नाही, असे एक शहर आहे. त्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगतो.

असे शहर कोठे आहे ?

असे एक शहर कॅलिफोर्नियामध्ये आहे, जिथे तुम्हाला कार किंवा बाईक ऐवजी प्रत्येक घराबाहेर विमान पार्क केलेले दिसेल. या शहराचे नाव कॅमेरून एअर पार्क आहे. येथे तुम्हाला प्रत्येक घराबाहेर विमाने दिसतील. आता असे का होते? सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीने म्हटले आहे की, कारण येथील सर्व लोक निवृत्त पायलट आहेत. कुणाला बाहेर जायचे असेल तर ते स्वतःचे विमान काढतात. येथे बांधलेला रस्ता धावपट्टीसारखा रुंद आहे. कॅमेरॉन एअर पार्क 1963 मध्ये बांधले गेले आणि येथे एकूण 124 घरे आहेत.

व्हायरल व्हिडिओ येथे पहा

इन्स्टाग्रामवर facttbyte नावाच्या पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.