लोकशाही न्यूज नेटवर्क
माहेरहून विवाहितेने शेतीसाठी घेतलेल्या कर्ज फेडण्यासाठी पैसे आणावेत या मागणीसाठी छळ होत असल्याने याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील ऑटोनगरातील रहिवासी प्रियंका मंगेश माळुकर वय २२ यांचा बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील तपोवन गावातील मंगेश एकनाथ माळूकर यांच्याशी विवाह झाला असून शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी माहेरुन १ लाख रुपये आणावेत अशी मागणी पती मंगेश याने प्रियंका हिला केली. या मागणीसाठी २८ मार्च २०२१ ते ११ सप्टेंबर २०२२ या दरम्यान पतीने वेळावेळी प्रियंकाला मारहाण केली तर सासू व जेठ यांनीही शिवीगाळ व दमदाटी करत तिचा छळ केला. याप्रकरणी प्रियंका यांनी दिलेल्या तक्रारीवरुन तिचे पती मंगेश माळूकर, सासू उषा माळुकर, जेठ योगेश माळूकर या तीन जणंविरोधात गुरुवारी एमआयडीसी पोलिसात गुन्ह दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय पाटील हे करीत आहेत.
Trending
- ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
- नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
- जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
- अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
- वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
- दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
- बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
- प्रेमसंबंधाचा विरोध ठरला जीवघेणा!

