पाटणादेवी परिसरातील मंदिराची दानपेटी फोडून रक्कम लांबविली !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
दानपेटी फोडून यातील रक्कम लंपास करण्यात आल्याची घटना तालुक्यातील पाटणादेवी परिसरातल्या चंडीका माता मंदिरात आज उघडकीस आली असून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, पाटणादेवी येथील मुख्य चंडीका माता मंदिरातील दानपेटी फोडून यातील रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे आज सकाळी उघडकीस आले. तसेच देवीजवळ असलेल्या पत्री दानपेटीला देखील चोरटे घेऊन गेल्याचे दिसून आले आहे. या दानपेटीत सुमारे दीड लाख रूपये असण्याची शक्यता फिर्यादीत व्यक्त करण्यात आली आहे.

याबाबत पुरातत्व खात्याचे कर्मचारी रविकांत उदयराज पाल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चाळीसगाव पोलीस स्थानकात भादंवि कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोलीस करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.