जळगावात १६ वर्षीय मुलीची आत्महत्या

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरातील ईश्वर कॉलनीमध्ये राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने राहत्या घरात गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अल्पवयीन मुलगी जळगाव शहरातील ईश्वर कॉलनीत आपल्या परिवारासह वास्तव्याला होती. वडील धान्य मार्केट दुकानात दलालीचे काम करतात. ते शुक्रवारी १२ जानेवारी रोजी सकाळी कामाला निघून गेले. तर मुलगी ही आईसोबत घरी होती. दुपारी २ वाजेच्या सुमारास आई गायीला पाणी पाजण्यासाठी घरातून बाहेर गेल्याने घरी एकटी असल्याची संधी साधता मुलीने गळफास घेवून आत्महत्या केली.

दरम्यान गायीला पाणी पाजून आई घरात आल्यानंतर मुलीने गळफास घेतल्याचे दिसून आले. गळफास घेतलेल्या अवस्थेत मुलीला पाहताच आईने हंबरडा फोडला. अद्याप आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. नागरीकांच्या मदतीने तिला खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस नाईक सुनील सोनार हे करीत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.