भुसावळात घरफोडी ; दागिन्यांसह रोकड केली लंपास

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
एका तरुणाच्या घरातून सोन्याचे व चांदीचे दागिने आणि रोकड असा ४१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार भुसावळ शहरातील खडका भागात उघडकीस आहे. याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुतांझीर शेख मेहमूद (वय-२९) रा. मुस्लिम कॉलनी बडी खानका जवळ, हे मोलमजूरी करून आपला उदरनिर्वाहकरतात. ११ जानेवारी रोजी दुपारी २ ते १२ जानेवारी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान त्याचे घर बंद असताना अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातून सोन्याचे दागिने रोकड असा एकूण ४१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील जोशी करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.