तिघांनी केला तरुणाावर धारदार चाकूने वार

0

जळगाव : काहीही कारण नसतांना उभ्या असलेल्या तरुणावर तिघांनी धारदार चाकूने वार करुन गंभीर जखमी केले. ही घटना शहरातील पिंप्राळा हुडकोमधील भिम नगरात रविवारी रात्रीच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी तिघांविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात पप्पु शिरसाठ हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. रविवार दि. ३ मार्च रोजी रात्री ११
वाजेच्या सुमारास पप्पु शिरसाठ हा पिंप्राळा हुडकोमधील भीम नगरात उभा होता. यावेळी काहीही कारण नसतांना सतिष केदार, प्रकाश सोनवणे आणि अश्विन सुरवाडे (सर्व रा. पिंप्राळा हुडको) या तीन जणांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत चाकूने वार  करून जखमी केले.

जखमीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी सोमवारी रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी सतिष केदार, प्रकाश सोनवणे आणि अश्विन सुरवाडे या तिघांविरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ चंद्रकांत पाटील हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.