जळगाव : शहरातील मोहाडीरोड वरील शासकीय महिला रुग्णालयात आवारातून इलेक्ट्रिक बॅटऱ्या, सबमर्सिबल पंप, लोखंडी आसारी आणि ईलक्ट्रीक केबल असा एकूण १ लाख २७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना सोमवार दि. ४ मार्च रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला .
आहे. शहरातील मोहाडी रस्त्यावरील शासकीय महिला रुग्णालय येथे अज्ञात चोरट्यांनी रुग्णालयाच्या मालकीचे ३ इलेक्ट्रिक बॅटऱ्या, सबमर्सिबल पंप, लोखंडी आसारी, ईलेक्ट्रीक केबल असा एकूण १ लाख २७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी २ मार्च सायंकाळी ६ ते ४ मार्च सकाळी ९ वाजेच्या दरम्यान चोरून नेला.
हा प्रकार उघडकीला आल्यानंतर येथील कर्मचारी आयुष मणियार यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सोमवार दि. ४ मार्च रोजी सायंकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोहेकॉ रामकृष्ण पाटील हे करीत आहे.