पाच लाख रूपये आणावे यासाठी विवाहितेचा छळ

0

जळगाव : पत्त्याचा क्लब टाकण्यासाठी व घराचे बांधकाम करण्यासाठी माहेरहून पाच लाख रूपये आणावे यासाठी नयना मुकेश शिंदे (वय २८) या विवाहितेचा छळ करण्यात आला. याप्रकरणी पतीविरुद्ध – दि. ४ मार्च रोजी शनिपेठ – पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या नयना शिंदे यांचा विवाह २०१९ मध्ये मुकेश अभिमन शिंदे याच्यासोबत झाला.
पत्त्याचा क्लब टाकण्यासाठी – घराचे बांधकाम करण्यासाठी विवाहितेने माहेरहून पाच लाख रुपये आणावे, अशी मागणी पती मुकेश शिंदेने केली. विवाहितेने माहेराहून पैसे आणले नाही म्हणून शिवीगाळ करत मारहाण केली. तसेचे पैसे घेवून येशील तर तुला घरात घेईल अशी धमकी देवून शारिरीक व मानसिक छळ केला.

या प्रकरणी विवाहितेने शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पती मुकेश शिंदेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील पोहेकॉ विजय पाटील करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.