सेन्सोडाइन कंपनीला ठोठावला दहा लाखांचा दंड; काय आहे प्रकरण ?

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

सेन्सोडाइन कंपनीला खोटी जाहिरात केल्याप्रकरणी ग्राहक संरक्षणने दहा लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटीने सेन्सोडाइन उत्पादनांच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींविरुद्ध एक आदेश पारित केला आहे. या आदेशात दावा केला आहे की, “जगभरातील दंतवैद्यांनी शिफारस केली आहे” आणि “जगातील नंबर 1 संवेदनशील टूथपेस्ट”. मात्र हा दावा खोटा ठरला आहे. म्हणून 9 फेब्रुवारी रोजी, प्राधिकरणाने ग्लॅक्सोस्मिथक्लाइन कंझ्युमर हेल्थकेअरला सेन्सोडाइन उत्पादनांची जाहिरात बंद करण्याचे निर्देशही दिले होते. तसेच त्यांना 10 लाख रुपयांचा दंड भरण्याचे निर्देशही दिले होते, असे ग्राहक व्यवहार मंत्रालयाने मंगळवारी एका निवेदनात म्हटले आहे.

सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटीने सेन्सोडाइन या कंपनीने सादर केलेल्या दोन दाव्यांबाबत परीक्षण केले. कंपनीने केलेल्या दाव्यात ‘जगभरातील दंतवैद्यांनी शिफारस केलेले’ आणि ‘जगातील नंबर 1 संवेदनशील टूथपेस्ट’ – जे केवळ भारतातील दंतवैद्यांनी शिफारस केलेले होते. “जाहिरातींमध्ये केलेल्या दाव्यांची पुष्टी करण्यासाठी किंवा सेन्सोडाइन उत्पादनांचे जागतिक स्तरावर कोणतेही महत्त्व सूचित करण्यासाठी कंपनीने कोणताही ठोस अभ्यास किंवा साहित्य सादर केले नाही. असे परीक्षण सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटीने केले.

तसेच ‘वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध आराम, 60 सेकंदात कार्य करते’ या दाव्याच्या संदर्भात देखील सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटीने भारतीय औषध नियंत्रक जनरल, सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन यांना लिहिलेल्या या दाव्यांच्या अचूकतेबद्दल काही मुद्दे मांडले होते. औषध नियामक CDSCO ने सहाय्यक औषध नियंत्रक, परवाना प्राधिकरण, सिल्वासा यांना कंपनीने केलेल्या दाव्यांची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. कारण हे उत्पादन राज्य परवाना प्राधिकरण, सिल्वासा यांनी दिलेल्या कॉस्मेटिक परवान्याअंतर्गत तयार केले आहे. दरम्यान सहाय्यक औषध नियंत्रकाने CCPA ला पत्र लिहिले आहे की कंपनीने केलेल्या दाव्यांची चौकशी सुरू आहे आणि सुनावणी प्रक्रियेनंतर पुढील कारवाई सुरू केली जाईल, असे निवेदनात म्हटले आहे.

तसेच दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटीने कठोर कारवाई असून 13 कंपन्यांनी त्यांच्या जाहिराती मागे घेतल्या आणि 3 कंपन्यांनी सुधारात्मक जाहिराती केल्या. दिशाभूल करणार्‍या जाहिराती आणि अनुचित व्यापार पद्धतींपासून ग्राहक हिताचे रक्षण करण्यासाठी, सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटीने दोन सूचनाही जारी केल्या आहेत.

20 जानेवारी 2021 रोजी पहिली सल्ला जारी करण्यात आली, ज्यामध्ये उद्योग भागधारकांना कोविड-19 साथीच्या परिस्थितीचा फायदा घेणारे आणि कोणत्याही सक्षम आणि विश्वासार्ह वैज्ञानिक पुराव्याद्वारे समर्थित नसलेले दिशाभूल करणारे दावे करणे थांबवण्याचे आवाहन करण्यात आले.

ग्राहक संरक्षण (ई-कॉमर्स) नियम, 2020 च्या तरतुदींचे पालन अधोरेखित करणारा दुसरा सल्ला 1 ऑक्टोबर, 2021 रोजी जारी करण्यात आला, ज्यासाठी प्रत्येक मार्केटप्लेस ई-कॉमर्स संस्थेने नियम 6 अंतर्गत विक्रेत्याने प्रदान केलेली सर्व माहिती ठळकपणे प्रदर्शित करणे आवश्यक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.