पाचोऱ्यात कृषी सहाय्यकास दिड हजारांची लाच घेताना पकडले

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

शेतीसाठी लागणाऱ्या पावर ट्रेलर मशीनवर मिळणारी सबसीडी बँक खात्यात जमा करण्याच्या मोबदल्यात दीड हजाराची लाच घेणाऱ्या कृषी सहाय्यक अधिकाऱ्याला जळगावच्या एसीबी पथकाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे कृषी विभागात खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती अशी की, तक्रारदार हे पाचोरा तालुक्यातील रहिवासी असून त्यांनी त्यांच्या आईच्या नावे महाराष्ट्र कृषी विभागाची राज्य कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत शेती कामासाठी लागणारे बी.सी.एस. पावर ट्रिलर मशीन घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला होता. हा अर्ज तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाकडून मंजूर झाला होता.

मशीन खरेदी केली असता सदर योजनेअंतर्गत मिळणारी ८५ हजार रुपयांची सबसिडी अर्जदाराच्या खात्यात जमा करण्याच्या मोबदल्यात तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी सहाय्यक ललितकुमार विठ्ठल देवरे (वय ३२, रा. आनंद नगर, प्रतिभा फ्लोअर मिल जवळ, पाचोरा) याने दीड रुपयाची मागणी केली होती.

याबाबतची तक्रार जळगाव येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार दि. २४ मार्च रोजी पथकाने सापळा रचून १ हजार ५०० रुपयांची लाचेची रक्कम स्विकारतांना अधिकाऱ्याला पकडले. या कारवाईमुळे पाचोरा तालुक्यात खळबळ उडाली आहे.

सदरची कारवाई पोलीस उपअधिक्षक शशिकांत पाटील, पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, एन. एन. जाधव, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, सहाय्यक फौजदार सुरेश पाटील, पो. हे. कॉ. अशोक अहिरे, पो. हे. कॉ. सुनिल पाटील, पो. हे. काॅ. रविंद्र घुगे, पो. हे. कॉ. शैला धनगर, पो. ना. मनोज जोशी, पो. ना. जनार्धन चौधरी, पो. ना. सुनिल शिरसाठ, पो. कॉ. प्रविण पाटील, पो.कॉ. महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो. कॉ. ईश्वर धनगर, पो. कॉ. प्रदिप पोळ यांनी कारवाई केली.

Leave A Reply

Your email address will not be published.