महिलांमधील कर्करोग निदान आणि उपचार

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

आपल्या समाजाने स्त्रीला आदिशक्तीची उपमा दिलेली आहे. स्त्री ही क्षणभराची पत्नी आणि अनंतकाळची माता असते असेही म्हणतात. जगाची उद्धारकर्ती आणि जगाची नवनिर्मिती करणारी स्त्री म्हणजे कोणत्याही कुटुंबाचा आधार असते. कुटुंबातील कुणाचंही आरोग्य बिघडलं कि हीच स्त्री समर्थपणे काळजी घ्यायला त्या व्यक्तीची शुश्रूषा करण्यास सज्ज असते. परंतु संपूर्ण कुटुंबाची सतत काळजी वाहणाऱ्या याच स्त्रीच्या स्वतःच्या आरोग्याची काळजी मात्र ती

घेत नाही. कामाची धावपळ, व्यायामाचा अभाव, सततचा ताण, वेळी अवेळी जेवणाची सवय अशा अनेक कारणांमुळे याच स्त्रीचे आरोग्य हे बिघडते.

खरंतर चाळिशीनंतर प्रत्येक स्त्रीच्या विशिष्ट प्रकारच्या शारीरिक चाचण्या करणं गरजेचं असत कारण अनेकदा अनेक प्रकारच्या आजाराचं निदान हे कर्करोगात परावर्तित झालेलं दिसत. मुळातच वैद्यकीय संशोधनानुसार आपल्या देशात स्त्रियांमध्ये कर्करोगचं प्रमाण हे खूप वाढताना दिसत आहे. याच अनुषंगाने

महिलांमधील कर्करोग त्याची विविध कारण, निदान आणि कर्करोगावर उपचार या विषयवार बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपप्राचार्य आणि शरीरविकृती शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. शारदा राणे यांच्याशी केलेली बातचीत.

१] कर्करोग म्हणजे नक्की काय ?, या अनुषंगाने महिलांचं आरोग्य हे अतिशय महत्वाचं आहे ते नेमकं कसं ?

– आपल्या समाजाने स्त्रीला जरी आदिशक्तीची वैगेरे उपमा दिलेली असली तरी प्रत्यक्षात समाजाचं वागणं हे नेमकं विरुद्ध असत. अगदी पूर्वीपासून एखाद्या कुटुंबात मुलापेक्षा मुलींना दुजाभावाची, दुय्यम वागणूक दिली जाते. मुलगा मुलगी हा फरक आजही अनेक कुटुंबामध्ये केला जातो. त्यामुळेच मुलीपेक्षा मुलांच्या खाण्यापिण्याकडे जास्त लक्ष दिल जात. मुलांच्या आरोग्याची काळजी जास्त घेतली जाते. यामुळेच अगदी लहानपणापासूनच स्त्रीच्या आरोग्याची आबाळ होताना दिसते. परिणामी विविध आजारांना तिला सामोरं जावं लागत. संपूर्ण जगाचा विचार केला तर जगभरातील स्त्रियांमध्ये सर्व्हायकल कँसरचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात दिसून येते. आता यावर प्रतिबंधात्मक स्वरूपाची लस उपलब्ध आहे. परंतु या संदर्भात अजूनही आपल्याकडे जनजागृती नाही.

आता कँसर किंवा कर्करोग म्हणजे काय ते पाहू. ग्रीक शास्त्रज्ञ हिपोक्रेट्स याने कार्कीनॉस म्हणजेच कँसर असे या आजराचे नामकरण केले. कर्करोग हा खेकड्यासारखा आजार आहे म्हणजे खेकड्याला जसे खूप पाय असतात आणि या प्राण्याची पकड जशी घट्ट असते तसाच हा कर्करोग शरीरात झपाट्याने पसरतो आणि एखाद्या अवयवाला घट् चिकटून बसतो. शरीरातील एखाद्या अवयवयात पेशी किंवा उतींची मोठ्या प्रमाणात वाढ होते आणि या वाढीवरच नियंत्रण सुटलं की एक गाठ बनते. ही गाठ कर्करोगाची असू शकते.

२] कर्करोगाचे साधारण किती प्रकार असतात ?

– त्वचेचा कर्करोग असतो ज्याला कार्सिनोमा म्हणतात. तसेच शरीरातील अन्ननलिकेपासून गॅस्ट्रो सिस्टीम पर्यंत मोठे आतडे लहान आतडे याला होणार कर्करोग म्हणजे ऑडिनोकार्सिनोमा होय. हाड किंवा स्नायूंना होणार कर्करोग ज्याला सार्कोमा म्हणतात. आणि रक्ताचा कर्करोग ज्याला वैद्यकीय भाषेत लिम्फोमा असं म्हणतात.

३] कर्करोगाच्या या प्रकारांपैकी महिलांमध्ये कोणते कर्करोग आढळून येतात ?

जागतिक स्तरावर किंवा भारतात कर्करोग संशोधन केंद्रात केल्या गेलेल्या नोंदीनुसार आपण कर्करोगाचे प्रमाण पुरुष आणि स्त्रियांमध्ये किती आहे ते ठरवतो. आपल्याकडे पुरुषांमध्ये विविध प्रकारच्या धुम्रपानामुळे आणि तंबाखूच्या नियमित सेवनामुळे फुफुसाच्या कर्करोगाचे प्रमाण हे जास्त आढळते. पूर्वी स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या तोंडाचा कर्करोग हा स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणत आढळत होता. परदेशांत मात्र या संदर्भात जनजागृती होती. स्त्रियांमध्ये स्तनांचा कर्करोग हा जगभरात मोठ्या प्रमाणात आढळून येतो. स्त्रिया या मोठ्या प्रमाणात तंबाखू आणि मशेरीचे व्यसन जास्त प्रमाणात करत असल्यामुळेच मुखाचा कर्करोग देखील स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. शिवाय महिलांमध्ये मोठ्या आतड्याचा कर्करोग देखील जास्त प्रमाणात आढळून येतो.

४] महिलांमध्ये कर्करोगाचे जे प्रमाण मोठ्या प्रमाणत दिसते त्याची कारण काय आहेत ?

– सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आपली बदलती जीवनशैली. पूर्वी महिला घरातच असत. आता स्त्रिया देखील कमावत्या झालेल्या आहेत. त्यामुळे त्या घराबाहेर पडताहेत. अनेक प्रकारचे ताण तणाव, कुटुंबाची काळजी, आहाराची हेळसांड, मोठ्या प्रमाणात फास्टफूडचं सेवन, स्वतःच्या आहाराकडे होणार दुर्लक्ष किंवा आबाळ अशा अनेक कारणामुळे हळूहळू कर्करोगासारख्या आजाराला महिला बळी पडतात.

५] महिलांमध्ये मुखाचा कर्करोग आणि गर्भाशयाचा कर्करोग होण्याची कारण काय आहेत ?

– आपल्याकडे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आणि शहरी भागात देखील महिला तंबाखू भाजून बनवलेली मशेरी मोठ्या प्रमाणात लावतात ही मशेरी दाताखाली दाबून ठेवतात. त्यामुळे कर्करोगास कारणीभूत ठरणारे टॉक्सिन टोनर तयार होतात. आणि पुढे अल्सर व त्यानंतर कर्करोगात पर्यवसान होते. गर्भाशयाच्या कर्करोगाचं प्रमुख कारण म्हणजे कमी वयात लैंगिक संबंध प्रस्थापित झाल्याने एचआयव्हीच्या विषाणूंचा संसर्ग होतो आणि गर्भाशयाचा कर्करोग मुलींमध्ये दिसतो. परदेशात या गर्भाशयाच्या कर्करोगावर लस उपलब्ध झालेली आहे. मात्र आपल्याकडे अजूनही त्याबाबत हवी त्या प्रमाणात जनजागृती झालेली नाही. महिलांमध्ये जो अंडाशयाचा आणि स्तनाचा कर्करोग देखील दिसतो त्याच कारण हे अनेकदा अनुवांशिक असू शकत. एखाद्या कुटुंबात तशा आजाराची हिस्ट्री असेल तर पुढे हा अंडाशयाचा कर्करोग संक्रमित होतो.

६] कर्करोग होण्याची आणखी कोणकोणती कारण सांगता येतील ?

– पाश्चिमात्य देश आणि आपल्याकडच्या कर्करोग बाधित रुग्णांचा अभ्यास केला तर स्त्रिया आणि पुरुषांमध्ये कर्करोग हा मोठ्या प्रमाणात आढळतो. आपल्या बदलेल्या खाण्यापिण्याच्या सवयी, आपण जे खातो ते पचविण्याची पचनशक्ती, आपल्या आहारात ज्या भाज्या, फळं आपण खातो त्यामध्ये असणारा मोठ्या प्रमाणातील रासायनिक अंश अशा अनेक कारणामुळे कर्करोग होऊ शकतो.

७] कर्करोगाचे निदान नेमके कशा प्रकारे केले जाते ?

– कर्करोगाचे निदान करण्यासाठी ३ प्रकारच्या चाचण्या उपलब्ध आहेत. रुग्णालयात रुग्ण जेव्हा येतो तेव्हा त्याला नेमका काय त्रास होतो आहे ? कुठे विशिष्ट प्रकारची न दुखणारी गाठ आहे का ? किंवा महिलांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात मासिक पाळीनंतर रक्तस्त्राव होणे किंवा सफेद पाणी मोठ्या प्रमाणात जाणे, खूप थकवा येणे, दम लागणे, भूक न लागणे, कशातही रस नसणे अशी लक्षण असली की आम्ही चाचणी करतो. रुग्णाला बाहेरून काहीही जाणवत नाही परंतु भूक कमी लागते, खूप थकवा जाणवतो ही कर्करोगाची लक्षण असू शकतात. त्यासाठीच रुग्णाची अल्ट्रासोनोग्राफी, एमआरआय, सिटी स्कॅन करून आम्ही नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न करतो. एखादी गाठ असेल तर बायोप्सी म्हणजे त्या गाठीच्या जागेचा म्हणजे उतीचा छोटासा काप घेऊन त्याचे निदान केले जाते. महिलांमध्ये ऍनिमियाचा प्रमाण जास्त असत. रक्तातील हिमोग्लोबिन कमी होणं हा कर्करोग असण्याचा इशारा असू शकतो. शरीरावरील गाठीची एफएमएसी चाचणी करून म्हणजे त्या गाठीतील पाणी सुईने काढून त्याची चाचणी केली जाते आणि त्यानंतर निदान होत.

८] अनेकदा एखाद्या रुग्णाच्या पोटात खूप दुखते, त्याचे निदान होते ते अपेन्डिस आहे म्हणून आणि प्रत्यक्ष शस्त्रक्रिया करताना एखादी गाठ उदभवलेली दिसते ती कर्करोगाची असू शकते का ?

– नक्कीच. अनेकदा आमचा अनुभव हा असाच असतो. एखाद्या रुग्णाच्या पोटात खूप दुखत असत. चाचणी केल्यानंतर अपेन्डिसच निदान होत. मात्र प्रत्यक्षात जेव्हा त्या व्यक्तीवर शस्त्रक्रिया सुरु असते तेव्हा शरीराच्या अंतर्भागात एखादी मोठी गाठ दिसते. ज्यामुळे खरं तर त्या व्यक्तीला तीव्र वेदना होत असतात. आणि जेव्हा त्या गाठीच निदान होत तेव्हा ती गाठ कर्करोगाची असू शकते. शरीरात एका ठिकाणी असलेला कर्करोग अनेकदा असा रक्ताद्वारे शरीरातील इतर अवयवांमध्ये झपाट्याने पसरतो.

९] कर्करोग होऊ नये म्हणून महिलांनी नेमकी काय काळजी घयायला हवी ?

– आपण आपली जीवनशैली तर बदलू शकत नाही. मात्र जीवन जगताना नेहमी सकरात्मक वृत्तीने आपण जीवन जगायला हवे. ज्यांना कर्करोग होतो ते लोक मानाने लवकर खचतात आणि लवकर जातात. परंतु आपण नेहमी स्ट्रॉंग असायला हवं. आपला आहार हा पौष्टिक असावा. फास्टफूड किंवा जंकफूड हे टाळायलाच हवे. नियमित व्यायाम देखील तितकाच महत्वाचा आहे. आणि प्रिझर्वेटिव्ह केलेलं अन्न खाऊ नये. स्त्रियांनी स्तनाचा कर्करोग टाळायचा असेल तर

चाळीशी नंतर रोज आपल्या हाताने स्तनाची चाचपणी करून कुठे गाठ तर नाही ना ? हे तपासले पाहिजे. चाळिशीनंतर दरवर्षी स्त्रियांनी मनोग्रफी करायलाच हवी. तणावमुक्त जीवनशैली. पौष्टिक आहार, नियमित व्यायामी आणि सकारात्मक वृत्तीने जगणं हे केलं तर आपला कर्करोग सारख्या जीवघेण्या आजारापासून बचाव होऊ शकतो.

संकलन –संयोजन

सुबोध रणशेवरे

संपर्क -९८३३१४६३५६

इमेल – [email protected]

Leave A Reply

Your email address will not be published.