“यापुढे जेसीबी चालवला जाईल” चाळीसगावात आमदार मंगेश चव्हाणांनी उधवस्त केले अश्लील कॅफे…

0

 

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

शहरात तरुण तरुणींना अश्लील चाळ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या चाळीसगाव शहरातील U S Cafe या अनधिकृत कॅफेवर आज पोलिसांनी कारवाई केली. यावेळी तेथे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाणही पोहोचले व त्यांनी तेथे असलेले अनधिकृत डार्क रूम उध्वस्त केले. यादरम्यान तेथे कुठल्याही प्रकारचे चहा, नाश्ता पदार्थ किंवा साहित्य आढळून आले नाही. तसेच अश्लील चाळ्यांसाठी एक डार्क रूम तिथे तयार केली होती. एकूणच तरुण पिढीला चुकीच्या कृत्यांसाठी प्रोत्साहन याठिकाणी मिळत होते.

यावेळी चाळीसगाव शहरात असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. असेही आमदार चव्हाणांनी ठणकावून सांगितले, नगरपालिकेच्या हाकेच्या अंतरावर हा अनधिकृत कॅफे सुरू होता, त्याकडे जर जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असेल तर संबंधित नगरपालिका अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्याचा सूचना त्यांनी दिल्या. सदर ठिकाणी ६ मुलं आणि ६ मुली आढळून आल्या होत्या. खरंतर मुलगी ही कोणाच्याही घरची असेना तिच्या इभ्रतीची काळजी घेणे, तिचा सन्मान करणे ही छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्याला शिकवण आहे. त्याच्यामुळे सदर मुलींची नावे पुढे न करता त्यांच्या पुढील शैक्षणिक किंवा दुसरं काही नुकसान व्हायला नको त्याची खबरदारी म्हणून, तसेच मुलांना प्रिव्हेन्शन म्हणून पोलीस प्रशासनास कारवाई करण्याचा सूचना दिल्या आहेत.

यावेळी त्यांनी म्हटले कि, माझी नागरिकांना विनंती असेल, चाळीसगाव शहरामध्ये वा परिसरामध्ये असे चुकीचे प्रकार आपल्या लक्षात येत असतील त्यांनी ते माझ्या निदर्शनास आणून द्यावे. लोकप्रतिनिधी म्हणून राजकारणाच्या पलीकडे जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या मीही पार पडण्यास खंबीर आहे. पालकांना माझी एकच विनंती असेल आपला मुलगा / मुलगी काय करत आहेत याची जरा व्यवस्थित माहिती ठेवली पाहिजे. मुली पळून जाण्याचे प्रकार वाढले आहेत. रोज अश्या अनेक घटना घडत आहेत,  प्रत्येकच मुलगा आणि मुलगी अशी असते असं नाही पण एक जबाबदार पालक म्हणून आपल्या मुलांना विश्वासात घेऊन त्यांचे कौन्सलिंग केलं पाहिजे. आजचं प्रकरण म्हणजे हे चाळीसगाव शहराला लागलेली कीड आहे. असे प्रकार यापुढे सहन केले जाणार नाहीत, गरज पडली तर अश्या अनधिकृत बांधकामांवर जेसीबी चालवला जाईल एव्हढेच यानिमित्ताने सांगतो. असे यावेळी प्रतिक्रिया देताना आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.