बुलढाणा जिल्ह्यात ड्रग्स सदृश पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री

0

बुलढाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यात ड्रग्सचा मुद्दा गाजत असताना आता बुलढाणा जिल्ह्यात ड्रग्स सदृश पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याने समोर आले आहे. हे ड्रग्स सदृश्य पदार्थांचे सेवन केल्याने मागील वर्षात सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकांचे मानसिक संतुलन सुटले आहे.

बुलढाणा जिल्ह्यात ड्रग्सप्रमाणे दिसणाऱ्या पावडरची विक्री मोठ्या प्रमाणात केली जात आहे. खामगाव, लाखनगाव आणि सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखर्डा या गावांमध्ये याचे मोठे जाळे असल्याचे बोलले जात आहे. या अमली पदार्थाला ताडीची पावडर तर कुणी ड्रग्स म्हणत आहे. ही पावडर पाण्यामध्ये मिश्रित करून त्याचे सेवन केले जात आहे. हे प्रमाण वाढत चालले असून, देखील यावर अपेक्षित अशी कारवाई होत नसल्याचे पाहण्यास मिळत आहे.

विक्रेत्यांवर कारवाईची मागणी
साखरखेर्डा गावात ड्रग्ज सदृश्य पदार्थाचे सेवन केल्याने वर्षभरात सात जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर अनेक जणांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे. त्यामुळे या विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी साखरखेर्डा गावकऱयांनी केली आहे. तशी तक्रार एमआयएमच्या माध्यमातून जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना देखील देण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.