SBI च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी, लोनच्या नियमात बदल

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

भारतीय स्टेट बँकच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या SBI ने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) मध्ये बदल केला आहे. ओव्हरनाईट, एक महिना, तीन महिने आणि सहा महिन्यांचा एमसीएलआर अनुक्रमे 8 टक्के, 8.15 टक्के आणि 8.45 टक्के आहे. याच पद्धतीने एक वर्षाचा एमसीएलआर 8.55% आहे. तर दोन वर्षांचा एमसीएलआर 8.65 टक्के तर तीन वर्षांचा एमसीएलआर 8.75% एवढा आहे.

 

एसबीआयचा एमसीएलआर 

ओव्हरनाईट : 8 टक्के

एक महिना : 8.15 टक्के

तीन महिने : 8.15 टक्के

सहा महिने : 8.45 टक्के

एक वर्ष : 8.55 टक्के

दोन वर्ष : 8.65 टक्के

तीन वर्ष : 8.75 टक्के

 

एमसीएलआर म्हणजे काय? 

बँका ज्या दराने आपल्या ग्राहकांना कर्ज देऊ शकते, हा तो किमान दर आहे. बेंचमार्क एक वर्षाचा MCLR हा वाहन, पर्सनल अथवा होम लोन यांसारख्या कर्जावरील व्याजदर निर्धारित करण्यासाठी वापरला जातो.

भारतीय स्टेट बँक ही अॅसेट, डिपॉझिट, ब्रांच, ग्राहक आणि कर्मचारी या बाबतीत सर्वात मोठी बँक आहे. बँकेचा होम लोन पोर्टफोलिओ 6.53 लाख कोटी रुपये एवढा अधिक आहे. होम लोन आणि ऑटो लोनमध्ये बाजारातील एसबीआयचा वाटा अनुक्रमे 33.4% आणि 19.5% एवढा आहे. एसबीआयकडे भारतात 22,405 ब्रांच आणि 65,627 एटीएमचे मोठे नेटवर्क आहे. हिच्या ग्राहकांची संख्या 44 कोटीहूनही अधिक आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.