रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटप्रकरणी एनआयएने दोघांना केली अटक

0

बंगळुरू ;- कोलकाता येथून बंगळुरूच्या रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटप्रकरणी एनआयएने शुक्रवारी दोन आरोपींना अटक केली. 1 मार्च रोजी झालेल्या स्फोटात नऊ जण जखमी झाले होते.

अब्दुल मतीन ताहा आणि मुसावीर हुसेन शाजिब अशी त्यांची नावे आहेत. अदबुल मतीन ताहा आणि मुसावीर हुसेन शाजीब यांचा कोलकाताजवळील त्यांचा शोध घेण्यात आला आणि त्यांना पकडण्यात एनआयए टीमला यश आलं. आपली ओळख लपवून ते कोलकाताजवळ वास्तव्य करत होते असं एनआयएच्या प्रवक्त्याने सांगितले आहे. एनआयएच्या म्हणण्यानुसार, 2 मार्च रोजी शाजिबने कॅफेमध्ये आयईडी ठेवला होता, तर ताहाने संपूर्ण योजना तयार केली होती.

बंगळुरूमधील रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करत असलेल्या एनआयएने 5 एप्रिल रोजी सांगितले की या प्रकरणातील मुख्य आणि सहआरोपींची ओळख पटली आहे. मुसाविर हुसेन शाजिब हा मुख्य आरोपी असून अब्दुल मतीन ताहा हा सहआरोपी आहे. मुसावीरनेच कॅफेमध्ये स्फोटके नेली होती. दोघेही शिवमोग्गा जिल्ह्यातील तीर्थहल्ली येथील रहिवासी आहेत.

या दोघांच्या शोधात एनआयएने कर्नाटक, तामिळनाडू आणि यूपीमधील 18 ठिकाणी छापे टाकले होते. या दोघांवर 29 मार्चपासून 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. त्याचवेळी तपास यंत्रणेने बॉम्बस्फोट प्रकरणी भाजप कार्यकर्ता साईप्रसादलाही ताब्यात घेतले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.