बोदवड नगरपंचायतीवर नाथाभाऊंची पिछाडी; शिवसेनेचे वर्चस्व

0

बोदवड, लोकशाही न्यूज नेटवर्क

बोदवड नगरपंचायतीच्या दोन टप्प्यात झालेल्या मतदानाच्या मतमोजणीस प्रारंभ झाला. यावेळी १७ जागांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. यात शिवसेनेने नऊ जागांवर विजय मिळवला असून राष्ट्रवादीला सात जागा मिळाल्या आहेत. तर एका ठिकाणी भाजपच्या उमेदवाराला विजय मिळाला आहे. बोदवड नगरपंचायतीवर शिवसेनेने आपले वर्चस्व स्थापन केले आहे.

प्रभागनिहाय निकाल

प्रभाग क्रमांक १- शिवसेनेच्या  रेखा संजय गायकवाड यांनी विजय मिळविला. त्यांना ४६६ मते मिळालीत तर त्यांनी राष्ट्रवादीच्या प्रमीला संजय वराडे (मते २७९) यांना पराभूत केले. तर उर्वरित उमेदवारांमध्ये भाजपच्या वैशाली योगेश कुलकर्णी ( ७३) मते आणि कॉंग्रेसचे कुसूम अशोक तायडे (२१ मते) यांचा समावेश आहे.

प्रभाग क्रमांक २ – राष्ट्रवादीचे कडूसिंग पांडुरंग पाटील हे ३३७ मते मिळवून विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेनेच्या सचिन सुभाष देवकर (मते २३३) यांना पराभूत केले. तर याच प्रभागातून भाजपचे महेंद्र प्रभाकर पाटील यांना ७५ तर कॉंग्रेसचे अंकुश राजेंद्र अग्रवाल यांना ११ मते मिळालीत.

प्रभाग क्रमांक ३ – राष्ट्रवादीच्या योगीता गोपाळ खेवलकर यांनी विजय मिळविला. त्यांना ४०५ मते मिळाली. तर शिवसेनेच्या सुजाता खेवलकर यांना ३८५ आणि भाजपच्या कविता जैन यांना १६४ मते मिळालीत.

प्रभाग क्रमांक ४ – राष्ट्रवादीचे सैयद सईदाबी रशीद या ५११ मते मिळवून विजयी झाल्या. त्यांनी शिवसेनेचे कुरेशी सलीमाबी शेख कलीम २११ मते यांना पराभूत केले.

प्रभाग क्रमांक ५- गोपाळ बाबूराव गंगतीरे आणि भाजपचे विजय शिवराम बडगुजर यांना समसमान ३७४ मते मिळाल्याने ईश्‍वरचिठ्ठी काढण्यात आली. यात भाजपचे विजय शिवराम बडगुजर यांना विजयी घोषीत करण्यात आले.

प्रभाग क्रमांक ६ – शिवसेनेच्या पूजा प्रितेश जैन या ३०२ मते मिळवून विजयी झाल्या. त्यांनी राष्ट्रवादीच्या सरीता संदीप जैन (मते २९६) यांना पराभूत केले.

प्रभाग क्रमांक ७ – राष्ट्रवादीने विजय संपादन केला. येथून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पूजा संदीप पारधी यांनी २४४ मते मिळवून विजय मिळविला. तर येथून शिवसेनेचे उमेदवार संजू छगन गायकवाड यांना १८८ मते मिळाली.

प्रभाग क्रमांक ८- राष्ट्रवादीला यश लाभले येथून शेख एकताबी शेख लतीफ या ४३१ मते मिळवून विजयी झाल्या. त्यांनी संदीप मधुकर गंगतिरे (मते ३१४) यांना पराभूत केले.

प्रभाग क्रमांक ९- शिवसेनेचे उमेदवार आनंदा रामदास पाटील यांनी ४०६ मते मिळवून विजय संपादन केला. येथे राष्ट्रवादीचे उमेदवार नितीन चावदस वंजारी यांना १५५ मते मिळालीत.

प्रभाग क्रमांक १० – शिवसेनेच्या मनीषा कैलास बडगुजर यांनी विजय संपादन केला. त्यांनी रेखा कैलास चौधरी यांचा पराभव केला.

प्रभाग क्रमांक ११ – शिवसेनेचे उमेदवार बेबी रमेश भोई यांनी ४३९ मते मिळवून विजय मिळविला. येथे भाजपचे उमेदवार दिशा नरेशकुमार आहुजा यांना ३११ मते मिळालीत.

प्रभाग क्रमांक १२ – शिवसेनेचे उमेदवार शारदा सुनील बोरसे यांनी ५५६ मते मिळवून विजय संपादन केला.

प्रभाग क्रमांक १३- शिवसेनेचे बागवान सईद इब्राहिम बागवान यांनी विजय मिळविला. त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार यांना पराभूत केले.

प्रभाग क्रमांक १४ – राष्ट्रवादीचे शेख जाफर अल्ताफ यांनी ४०२ मते मिळवून विजय मिळविला. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार शेख ईसलाईल यांचा पराभव केला.

प्रभाग क्रमांक १५- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने विजय मिळविला असून येथील पक्षाचे उमेदवार शाह मुजम्मील शाह मुजफ्फर शाह यांनी६६२ मते मिळवून विजय मिळविला. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार पिंजारी शेख तौकीफ शेख अय्यूब यांचा पराभव केला.

प्रभाग क्रमांक १६ – शिवसेनेच्या उमेदवार बेबाबाई विनोद माळी यांनी विजय मिळविला.

प्रभाग क्रमांक १७ – शिवसेनेच्या मिराबाई दिनेश माळी यांनी विजय मिळविला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.