बोदवड तालुक्यातून २३ वर्षीय युवती बेपत्ता

0

बोदवड ;- तालुक्यातील येवती येथून एक २३ वर्षीय युवती घरात कुणालाही न सांगता निघून गेल्याची तक्रार तिच्या वडिलांनी दिल्यावरून बोदवड पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

जामनेर तालुक्यातील नांद्रा हवेली येथे राहणाऱ्या व्यक्तीची २३ वर्षीय मुलगी हि बोदवड तालुक्यातील येवती येथील त्यांच्या नातेवाईकांकडे होती. मात्र २७ जून २०२३ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास कुणाला काहीही न सांगता निघून गेल्याची फिर्याद तिच्या वडिलांनी दिल्याने बोदवड पोलिसांत हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. तपास पोहेकॉ संतोष चौधरी करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.