मुंबईत पुन्हा सिरीयल बॉम्बस्फोट करण्याची धमकी

0

मुंबई ;- मुंबई पोलिसांना पुन्हा एकदा धमकीचा फोन आला आहे. मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकी एका व्यक्तीने फोनवरून दिली आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला हा फोन आहे. विलेपार्ले परिसरातून बोलत असल्याचा दावा या व्यक्तीने केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

जुलै महिन्यातही मुंबई पोलिसांना असे धमकीचे फोन आले होते, यावेळी 26/11 हल्ल्याची पुनरावृत्ती करण्याची धमकी देण्यात आली होती.

आज सकाळी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला हा धमकीचा कॉल आला. फोनवरील व्यक्तीने मुंबईतील लोकलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा दावा केला. कॉल कंट्रोलमध्ये उपस्थित असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याने त्याच्याकडून अधिक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला. एका अधिकाऱ्याने सांगितलं की, पोलिसांनी फोन करणार्याला कोणती ट्रेन, बॉम्ब कुठे ठेवला आहे, असे विचारले असता त्याने कोणतेही उत्तर दिले नाही.

जुहूच्या विलेपार्ले परिसरातून फोन करत असल्याचे सांगून कॉलरने फोन बंद केला. पोलिसांनी संबंधित व्यक्तीच्या फोनचे लोकेशन ट्रेस केले असता त्याने जुहू येथून फोन केल्याचे निष्पन्न झाले. काही वेळाने फोन करणाऱ्याने त्याचा मोबाईल बंद केला. मात्र, पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सुरक्षा व्यवस्थेबाबत सतर्क राहण्याची सूचना संबंधित पोलीस ठाण्याला दिल्याचे सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

एटीएसने काही दिवसांपूर्वी मोहम्मद इम्रान मोहम्मद युनूस खान आणि मोहम्मद युनूस मोहम्मद याकूब साकी यांना पुणे पोलिसांकडून ताब्यात घेतले होते. हे दोघेही राजस्थानमधील रतलाम येथील असून ते आता महाराष्ट्र एटीएसच्या ताब्यात आहेत. या दोन्ही आरोपींवर NIA कडून पाच लाख रुपये बक्षीस सुद्धा जाहीर करण्यात आलेली होतं. त्याचबरोबर हे आरोपी अल सुफा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचा तपासात निष्पन्न सुद्धा झालं आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.