मुंबईत भाजपच्या प्रदेश कार्यालयाला आग

0

मुंबई ;-मुंबईतल्या भाजपच्या प्रदेश कार्यालयाला आग लागली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. भाजप कार्यालयामध्ये काही ठिकाणी दुरुस्तीचं काम सुरू होतं, त्यामुळे इथे काही अवजारं होती. अवजारांच्या इथे शॉर्ट सर्किट झालं. प्रदेश कार्यालयात लाकडी आणि पीओपीचं सामान आहे, तिथे आगीचा भडका उडाला आहे.

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार कार्यालयातील किचनमध्ये वेल्डिंगचे काम सुरू असताना शॉर्ट सर्किट होऊन आग पसरली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न केले गेले. आज रविवार असल्यामुळे इतर कर्मचाऱ्यांना सुट्टी असली तरी सोशल मीडियाचे काम करणाऱ्या टीममधील काही लोक कार्यालयात असल्याचे सांगितले जात आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.