भाजपच्या निवडणूक प्रमुखपदी करण पाटील…

0

 

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

भारतीय जनता पक्षाच्या एरंडोल विधानसभेच्या निवडणुक प्रमुखपदी पारोळ्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भाजपच्या एरंडोल विधानसभेच्या निवडणुक प्रमुखपदी पारोळ्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पाटील यांची आज निवड करण्यात आली आहे. करण पाटील यांनी याप्रसंगी बोलतांना सांगितले की एरंडोल विधानसभा क्षेत्रात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी व भारतीय जनता पक्षाची ताकद वाढविण्यासाठी भविष्यात प्रयत्न करू. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.