छत्तीसगडमध्ये काँग्रेस भाजपमध्ये चुरस, काँग्रेस ४७ जागांवर आघाडीवर

0

नवी दिल्ली ;-छत्तीसगड ,,मध्यप्रदेश ,राजस्थान आणि तेलंगाणा राज्यात आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात होऊन भाजपने यात मुसंडी मारली असून मात्र काँग्रेसला तेलंगणा आणि छत्तीसगड राज्यात बहुमत मिळू शकते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

छत्तीसगड ,,मध्यप्रदेश ,राजस्थान आणि तेलंगाणा राज्यातील निवडणुकीकडे समस्त देशाचे लक्ष लागले आहे. छत्तीसगड या राज्यात काँग्रेस आपली सत्ता कायम राखण्यात यशस्वी होईल की भाजपा पुन्हा एकदा मुसंडी मारेल, याची उत्सुकता सर्वांनाच लागली असून छत्तीसगडमधील ९० जागांसाठी दोन टप्प्यात मतदान पार पडले . ७ नोव्हेंबर रोजी येथे पहिल्या टप्यातील मतदान पार झालं; तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान १७ नोव्हेंबर रोजी पार पडलं. छत्तीसगडमधील ९० जागांवर लढणाऱ्या हजारो उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत कैद झालं आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेस आणि भाजपामध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे. दर मिनिटाला निकालाचा कौल एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाकडे झुकताना दिसत आहे. सध्याच्या घडीला काँग्रेस ४७ जागांवर आघाडीवर आहे. तर ४२ जागांवर भाजपा पुढे आहे. ९० पैकी एका जागेवर अपक्ष आमदार आघाडीवर असल्याचं दिसत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.