CID मध्ये फ्रेडरिक्सची भूमिका साकारणाऱ्या अभनेत्याची प्रकृती गंभीर !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

सीआयडी मध्ये फेड्रिक्स ही भूमिका साकारणारा अभिनेता दिनेश फडनीस याच्या प्रकृतीत बिगाड झाला असून, सध्या सर्वत्र फक्त फेड्रिक्सची चर्चा रंगली आहे. सीआयडीमध्ये आपल्या विनोदाने सर्वांना हसवणारा अभिनेता आता जीवन-मरणाची लढाई लढत आहे. दिनेश फडनीस याला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईच्या तुंग रुग्णालयात अभिनेत्याला उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. दिनेश फडणीस सध्या व्हेंटिलेटरवर असून जीवन-मरणाशी झुंज देत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

दरम्यान, शुक्रवारी १ डिसेंबरच्या रात्री अभिनेत्याची प्रकृती चिंताजनक होती. पण आता दिनेश याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती मिळत आहे. दिनेश फडनीस याच्या प्रकृतीबद्दल माहिती मिळताच चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.सध्या सर्वत्र फक्त फेड्रिक्सचीच चर्चा आहे.

अभिनेत्याच्या प्रकृतीची माहिती मिळताच चाहत्यांसह सेलिब्रिटिंनी देखील चिंता व्यक्त केली आहे. सीआयडी शोमधील स्टार कास्ट अभिनेत्याची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले. अभिनेत्याच्या प्रकृती लवकरात लवकर सुधारावी यासाठी चाहते, सेलिब्रिटी आणि कुटुंबिय प्रार्थना करत आहेत. वयाच्या ५७ व्या वर्षी हृदयविकाराचा झटका आल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.