थकबाकीदारांना शंभर टक्के शास्ती माफी ; मालमत्ता धारकांना शेवटची संधी

0

जळगाव : महापालिके तर्फेथकबाकीदार मालमत्ताधारकांना शेवटची संधी देण्यात आली असून दि.४ ते १९ डिसेंबर दरम्यान, थकबाकी भरणाऱ्या मालमत्ताधारकांना शास्ती माफीची योजना जाहीर करण्यात आली आहे.

महानगरपालिकेने तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधीची थकबाकी न भरणाऱ्या मालमत्ताधारकांच्या मालमत्तांचा लिलावाची प्रक्रिया सुरु केली असून दि.२२ रोजी हा लिलाव केला जाणार आहे. त्यामुळे थकबाकीदार मालमत्ता धारकांमध्ये घबराट पसरली असून त्यांच्याकडून आम्हाला शास्ती माफी करून एक संधी द्यावी अशी

मागणी आमदार राजूमामा भोळे यांना करण्यात आली. त्यानुसार आ. भोळे यांनी मनपा प्रशासनाने अभय शास्ती योजना राबविण्यात यावी, असे पत्र मनपा आयुक्तांना दिले आहे. या पत्राचा विचार करून महानगरपालिकेने दि.४ डिसेंबर ते १९ डिसेंबर २०२३ या कालावधीत १००% शास्ती माफीची योजना जाहीर केली आहे. सर्व थकीत कर मालमत्ताकर धारकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अन्यथा दि.२२ डिसेंबर रोजी अधिपत्र बजावलेल्या मालमत्तांच्या लिलाव केला जाणार असल्याचा इशारा मनपा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.