Rajasthan Election Result 2023 : राजस्थानमध्ये भाजपला ११३ जागांवर आघाडी काँग्रेस ६७ जागांवर पिछाडीवर

0

जयपूर ;– निकालाच्या दोन दिवस आधी मिझोरममधील मतमोजणी एक दिवस पुढे अर्थात ४ तारखेपर्यंत पुढे ढकलण्यात आली. मात्र, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड व तेलंगणा या चार राज्यांमध्ये आजच मतमोजणी होत असून काँग्रेस व भाजपा या दोन प्रमुख राष्ट्रीय पक्षांमधली ही लढत पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांची रंगीत तालीम मानली जात आहे. एग्झिट पोलमध्ये भाजपाला झुकतं माप मिळालं असलं, तरी भाजप आता ११३ जागांवर आघाडीवर असून काँग्रेस ६७ जागांवर पिछाडीवर असल्याचे चित्र दिसून येत आहे .

राजस्थानमधील मतमोजणीच्या निकालावर भाजपचे केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. त्यांनी,”भाजपा या निवडणुकीत मोठ्या बहुमताने जिंकेल. जादुगराची जादू संपली आहे, ताईत तुटला आहे. राजस्थानच्या जनतेनं या निवडणुका काँग्रेसला सत्तेतून पायउतार करण्यासाठी लढल्या होत्या” असे म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.