Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • एमपीएससी परीक्षेबाबत दुसरे जंतर-मंतर आंदोलन करणार!
    • मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट
    • परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज
    • ब्रिक्स : सांस्कृतिक संवादातून जागतिक एकात्मतेच्या नव्या पाऊलखुणा
    • पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू
    • आत्मसमर्पण टाळण्यासाठी ५ कोटी रुपये जमा करा!
    • विजय थलपती विरोधात विरोधक एकवटले
    • तुरुंगात गेल्यावर मला विपश्यनेलाच आल्यासारखं वाटलं
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»मनोरंजन»बिग बॉस १६ विनर “एमसी स्टॅन” ने मोडला ‘हा’ रेकॉर्ड
    मनोरंजन

    बिग बॉस १६ विनर “एमसी स्टॅन” ने मोडला ‘हा’ रेकॉर्ड

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveFebruary 16, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

    सध्या तरी सर्वांच्याच ओठांवर नाव असेल तर ते बिग बॉस १६ (Bog Boss 16) चा विजेता ‘एमसी स्टॅन’ (MC Stan) याच, ज्या पद्धतीने त्याने ट्रॉफी हि आपल्या नावे केली हि त्याच्या साठी सुद्धा आणि इतरांसाठी सुद्धा खूप आश्चर्यकारक बाब होती. लोकप्रिय रिॲलिटी शो ‘बिग बॉस 16’चा ग्रँड फिनाले रविवारी पार पडला. या ग्रँड फिनालेची अद्याप सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. शिव ठाकरे(Shiv Thakare) आणि प्रियांका चहर चौधरी (Priyanka Chahar Chaudhary) यांसारख्या तगड्या स्पर्धकांना मात देत रॅपर एमसी स्टॅनने विजेतेपद पटकावलं. एमसी स्टॅनचा मोठा चाहतावर्ग आहे. असं असलं तरी त्याच्या विजेतेपदावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. आता ट्रॉफी जिंकल्यानंतरही स्टॅनने लोकप्रियतेच्या बाबतीत नवीन विक्रम रचला आहे. विशेष म्हणजे एमसी स्टॅनने विराट कोहलीचाही (Virat Kohli) विक्रम मोडला आहे.

    रविवारी पार पडलेल्या ग्रँड फिनालेमध्ये एमसी स्टॅनने बिग बॉसची ट्रॉफी आपल्या नावे केली. शो जिंकल्यानंतर त्याने सूत्रसंचालक सलमान खानसोबतचा (Salman Khan) ट्रॉफीचा फोटो इन्स्टाग्राम पोस्ट केला. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलं, ‘आम्ही इतिहास रचला आहे. शेवटपर्यंत आम्ही खरेपणाने वागलो. असं त्याने कॅप्शन देत इन्स्टा वर पोस्ट केली.

    विराट कोहलीला टाकलं मागे
    एमसी स्टॅनच्या या पोस्टला 69,52,351 लाइक्स आणि 1,47,545 कमेंट्स मिळाले आहेत. विशेष म्हणजे याआधी बिग बॉस जिंकणाऱ्या कोणत्याच स्पर्धकाला सोशल मीडियावर इतके लाइक्स आणि कमेंट्स मिळाले नव्हते. एमसी स्टॅनने याबाबतीत बिग बॉस 15 ची विजेती तेजस्वी प्रकाश आणि बिग बॉस 14 चा विजेता सिद्धार्थ शुक्ला यांनाही मागे टाकलं आहे. स्टॅनची ही पोस्ट सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे. त्याचे चाहते याची तुलना विराट कोहलीशी करत आहेत.

    Bog Boss 16 MC Stan Priyanka Chahar Chaudhary Salman Khan Shiv Thakare Virat Kohli
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट

    September 9, 2026

    परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज

    September 9, 2026

    पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू

    September 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif