‘ई ऍग्री स्टेशन्स’ ठरणार शेतकऱ्यांसाठी वरदान : डॉ. अश्विनी गजऋषी

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

शेतकऱ्यांनी शेतात लावलेले पीक, त्याला मिळणारी खते, पाणी यासह हवामान अंदाज आणि पीक उत्पादन, कीडरोगविषयी माहिती कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आयओटी तंत्रज्ञानांतून मिळणार असून वर्षभरात यावर चांगले संशोधन झाल्यावर शेतकऱ्यांना ते उपलब्ध होऊन ते शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार असल्याची माहिती टीआयएच – आयओटी फाउंडेशन, आयआयटी मुंबईच्या इलेक्ट्रॉनिक्स सेन्सर्स शास्त्रज्ञ डॉ. अश्विनी गजऋषी यांनी दैनिक लोकशाहीशी बोलतांना दिली.

जैन हिल्स येथे नुकतीच कांदा लसूण परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेमध्ये डॉ. अश्विनी गजऋषी यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आयओटी तंत्रज्ञान संबंधित केलेल्या सादरीकरणाचे कौतुक उपस्थितांनी केले. यावेळी डॉ. अश्विनी गजऋषी, यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून या तंत्रज्ञानाबद्दल माहिती देऊन याविषयी मार्गदर्शन केले. अनेक कृषी संस्था विविध भाजीपाला, कापूस, सोयाबीन, इतर पिकांसाठी सामंजस्य करारासाठी शेतकऱ्यांनी अनेक इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले.

इंडियन सोसायटी ऑफ ऑलिअम्स, आयसीएआर कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय आणि जैन इरिगेशन सिस्टीम्स द्वारे ‘कांदा, लसूण आणि इतर अलियम प्रजातींचे शाश्वत उत्पादन आणि मूल्य साखळी व्यवस्थापनातील उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि ट्रेंड या विषयावर तिसरा राष्ट्रीय परिसंवाद 11 ते 14 फेब्रुवारी 2023 रोजी आयोजित करण्यात आला होता.

टीआयएच – आयओटी फाउंडेशनने विकसित केलेले आयओटी आधारित स्मार्ट अॅग्री स्टेशन शेतकरी, कृषी संशोधक, अभियंते आणि तंत्रज्ञ यांना दाखवण्यात आले. हवामानातील संभाव्य बदल, किडींचे आक्रमण, रोग यांचा अंदाज घेण्यासाठी आणि सिंचन व्यवस्थापनसाठी शेतकऱ्यांकरिता स्मार्ट अॅग्री स्टेशन स्टेशन विकसित करण्यात आले आहे. हे शेतकऱ्यांना आवश्यक उपाययोजनांशी संबंधित योग्य निर्णय घेण्यास मदत करते. स्मार्ट अॅग्री स्टेशन स्टेशन मातीचे परीक्षण (मातीचा ओलावा, तापमान, पी एच, खतांचे प्रमाण, विद्युत चालकता) करण्यासाठी विकसित केलेले आहे. सभोवतालचे तापमान आणि आर्द्रता, पाऊस, वाऱ्याचा वेग आणि सौर विकिरण आणि पानांची आर्द्रता ज्यामुळे पिकाच्या वाढीवर परिणाम होतो आणि कीड आणि रोगांचे आक्रमण होते. आयओटी-आधारित स्मार्ट अॅग्री स्टेशन डेटा विश्लेषण आणि अंदाज साठी डेटा सर्व्हरवर पाठवते.

स्मार्ट अॅग्री स्टेशन – कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामुळे कीड/रोगांच्या संभाव्य हल्ल्याचा अंदाज लावता येतो, सिंचनाची आवश्यकता कळते. त्यानुसार अलार्म आणि सुधारात्मक उपाययोजना पुढील कृतींसाठी शेतकऱ्यांना मोबाईल अॅपवर पाठवता येतात. स्मार्ट अॅग्री स्टेशन तंत्रज्ञान उत्पादन खर्च कमी करण्यासाठी, उत्पादन सुधारण्यासाठी, अनावश्यक कीटकनाशके आणि पाण्याचा वापर कमी करण्यासाठी आवश्यक मापदंडांच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या गरजेनुसार उपाय देऊ शकते.

Leave A Reply

Your email address will not be published.