भोसरी भूखंड घोटाळा; खडसे कुटुंबियांना मोठा दिलासा

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

खडसे कुटुंबियांना पिंपरी-चिंचवडमधील कथित भोसरी एमआयडीसीतील भूखंड घोटाळाप्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे. एकनाथ खडसे यांच्यासह पत्नी आणि जावयाला कोर्टानं नियमित जामीन मंजूर केला आहे.

नोव्हेंबर २०२३ मध्ये हायकोर्टाने  एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे आणि गिरीश चौधरी या तिघांना अंतरिम जामीन मंजूर केला होता. त्यानंतर आता त्यांना नियमित स्वरुपाचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळं खडसे कुटुंबियांसाठी हा मोठा दिलासा मिळाला आहे.

नेमकं प्रकरण काय ?

खडसे हे महसूल मंत्री असताना त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांनी २०१६ मध्ये भोसरीतील एमआयडीसीमध्ये एक भूखंड खरेदी केला होता. बाजारभावापेक्षा अगदी कमी किमतीत हा भूखंड खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते हेमंत गावंडे यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात खडसे यांच्यासह पत्नी आणि जावयावर गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तपासानंतर ११ ऑक्टोबर २०२३ रोजी आरोपींवर दोषारोपपत्र दाखल केलं होतं.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.