समालोचक हर्षा भोगले यांना डेंग्यूची लागण ; भारत -पाकिस्तान सामन्यात नाही राहणार उपस्थित

0

नवी दिल्ली ;– एकीकडे शुभमन डेंग्यूमधून सावरलेला असताना दुसरीकडे हर्षा भोगलेंना डेंग्यूचं निदान झालं आहे. यासंदर्भातील माहिती स्वत: हर्षा भोगलेंनीच आपल्या एक्स म्हणजेच ट्वीटर अकाऊंटवरुन दिली आहे.

14 तारखेच्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात मला सहभागी होता येणार नसल्याने मी निराश झालो आहे. मला डेंग्यूची लागण झाली असून फार अशक्तपणा जाणवतोय. तसेच रोगप्रतिकारशक्तीही कमी झाल्याने मला सामन्याला उपस्थित राहून कॉमेंट्री करण शक्य होणार नाही. मला अपेक्षा आहे की 19 तारखेला होणाऱ्या सामन्यापर्यंत मी बरा होऊन कॉमेंट्रीसाठी उपलब्ध असेल. माझे सहकारी, ब्रॉडकास्टर्सची टीम या सर्वांनी मला फार मदत केली. (ऑस्ट्रेलिया आणि भारताविरुद्धच्या सामन्यात या लोकांचा वर्लडलोड मी वाढवला) या या सर्वांचे आभार मानतो,” असं हर्षा भोगलेंनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.