भाजपला मोठं खिंडार; असंख्य कार्यकर्ते शिंदे गटात

0

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

भडगावमध्ये भाजपला मोठं खिंडार पडलं आहे.  भाजपाचे व माझे गाव माझे प्रतिष्टानचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र तत्तार व अखिल विद्यार्थी परिषद पदाधिकारी नितिन महाजन यांच्यासह असंख्य पदाधिकार्‍यांनी शिंदे गटात आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत प्रवेश केल्याने भडगाव भाजपाला मोठा धक्का बसला आहे.

शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या शिवालय या कार्यालयात भडगाव येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकच गर्दी केली होती. महेंद्र तत्तार यांच्यासह माझे गाव माझा परिसर प्रतिष्ठानचे संचालक सदस्य यांनी आमदार किशोर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितित शिंदे गटात प्रवेश केला.

यावेळी अमोल पाखले, मुन्ना परदेशी, शेख वकार, राहुल देवरे, राहुल माळी, पुंडलिक कुंभार, सौरभ बच्छाव, गोकुळ पाटील, दादु पाटील, अनिल मोरे, अनिल पवार, मंथन दिक्षित, सुशिल महाजन, साकिब खान, तेजस महाजन, भैय्या पुजारी व इतर कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला.

Leave A Reply

Your email address will not be published.