आपच्या महिला आमदाराला पतीची मारहाण, व्हिडीओ व्हायरल

0

पंजाब, लोकशाही न्यूज नेटवर्क 

आम आदमी पार्टीच्या महिला आमदाराला तिच्या नवऱ्याने मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.  सदर महिला आमदार आम आदमी पार्टीची पंजाब येथील आमदार आहे. त्यांचं नाव बलजिंदर कौर असं आहे.

व्हायरल व्हिडीओनुसार, बलजिंदर कौर या आपल्या पंजाब येथील घराच्या गच्चीवर काही माणसांसमवेत उभ्या आहेत. त्यानंतर या व्हिडीओत एक माणूस येतो आणि बलजिंदर यांच्याशी वाद घालू लागतो. वाद घालताना त्याचा संताप अनावर होतो आणि तो बलजिंदर यांना मारहाण करतो.

हा माणूस बलजिंदर कौर यांचा नवरा असल्याची माहिती मिळत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पंजाब राज्य सरकारच्या महिला हक्क संरक्षण लवादाने स्युमोटो नोटीस जारी केली आहे. जी महिला जनतेचे प्रश्न मांडते, तिला स्वतःच्या घरात अशा प्रकारे छळाला सामोरं जावं लागतं हे खूप खेदजनक असल्याचं मत लवादाच्या अध्यक्ष मनिषा गुलाटी यांनी व्यक्त केलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.