मुलांनी जन्मदात्यांना विसरू नये- व्याखाते अविनाश भारती

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

ज्या दिवशी भारतातले वृध्दाश्रम बंद होतील तो दिवस देशासाठी सुवर्ण क्षण असेल. त्यामुळे मुल कीतीही मोठे झाले तरी त्यांनी जन्मदात्यांना विसरता कामा नये असे मत व्याखाते अविनाश भारती यांनी मांडले. ते भडगाव तालुका पत्रकार संघाच्या (Bhadgaon Taluka Journalist Association) वतीने आयोजीत ‘आईबाप समजुन घेताना’ या विषयावरील व्याख्यानात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार किशोर पाटील होते. तर प्रमुख पाहूणे म्हणुन चाळीसगावचे आमदार तथा जिल्हा दुध संघाचे अध्यक्ष मंगेश चव्हाण (Mangesh Chavan),कीसान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव पाटील, पाचोरा भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, पीटीसीचे चेअरमन संजय वाघ, दुध संघाचे संचालक रावसाहेब भोसले, महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर पाटील, भडगाव तालुका पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सागर महाजन व्यासपीठावर उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले की, आईबाप मुलांसाठी काबाडकष्ट करतात. त्यांना उच्चशिक्षित करतात. मात्र तेच मुल त्यांना वागवायला तयार होत नाही. काही मुल तर अंत्यसंस्काराला येत नाही ही मोठी शोकांतिका आहे. श्रीरामाने वडीलाच्या वचनपुर्तीसाठी 14 वर्ष वनवास भोगला ही भारतीय संस्कृती आहे. मात्र सद्यःस्थितीचे दुर्दैवी गोष्ट आहे की मुल आपल्या आई-बापाला वनवासाला पाठवित आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि जिजाऊनी महाराष्ट्राची उभारणी केली. त्याच्यांच नावाने जास्त वृध्दाश्रम आहे ही मोठी शोकांतिका आहे. आईवडीलांसाठी काही केले नाही तरी चालेल पण त्यांना आई-वडील स्विकाराले तरी भरपूर आहे. आपण बापाला आपला हीरो मानला पाहीजे पण आजचे पोर दुसर्याला आपला हीरो समजातात याच्यापेक्षा दुसरे दुर्दैव काय असु शकते. आपल्या बापाच्या इच्छेसाठी मुलांनी जगले पाहीजे. मुलांची प्रगती बापासाठी अभिमानाचे असते. त्यांनी आपल्या व्याख्यातुन अनेक कवितांचा सदर्भ देत भारदस्त आवाजाने उपस्थीताचे मने जिकंली. दरम्यान सत्काराला उत्तर देतांना मंगेश चव्हाण यांनी भडगाव तालुका पत्रकार संघाचे कौतुक केले. तर पत्रकार संघ गेल्या 12 वर्षापासून राबवित असलेले विविध सामाजिक उपक्रम सजग समाज घडविण्याचे विधायक काम करत आहे. तर अध्यक्षसीय भाषणातून आमदार किशोर पाटील यांनी भडगाव तालुका पत्रकार संघ राज्यात एकमेव पत्रकार संघ असेल की, जो पत्रकार दिनी विधायक कार्यक्रम घेतो. भडगाव तालुक्यातील पत्रकार हे नेहमी जागल्याची भुमिका घेतो. विविध सार्वजनिक विषयांना वाचा फोडण्याचे काम करतो. पत्रकार सुधाकर पाटील यांना प्रतिष्ठेचा नानासाहेब परुळेकर राज्यस्तरीय स्मृती पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर पाटील, सुत्रसंचालन योगेश शिंपी तर सुनील कासार यांनी आभार मानले.

दुध संघाच्या संचालकाचा सन्मान

यावेळी जिल्हा दुध संघात गिरणा पट्ट्यातून चार संचालक निवडून लौकीक वाढवल्याबद्दल त्यांचा पत्रकार संघाच्या वतीने आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. जिल्हा दुध संघाचे चे अध्यक्ष आमदार मंगेश चव्हाण, संचालक रावसाहेब भोसले, डाॅ.पुनम पाटील यांच्यावतीने प्रतापराव पाटील तर दिलीप वाघ याच्यांवीते संजय वाघ यांनी नागरी सत्कार स्विकारला. याशिवाय पत्रकार सुधाकर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार मिळाल्याबद्दल त्याचां अमोल शिंदे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.