दहिगावच्या कविता पाटील यांची शिवशंभू संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड

0

दहिगाव, ता. यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क

येथील शिव शंभू संघटनेच्या युवती कविता ज्ञानेश्वर पाटील यांची महाराष्ट्र राज्य शिवशंभू संघटना प्रदेश अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. शिवशंभू संघटना महाराष्ट्र राज्य यांनी कविता पाटील यांच्या कार्याची दखल घेऊन पंढरपूर येथे झालेल्या शिवशंभू संघटनेच्या राज्य “शिवस्फुर्ती” राज्यस्तरीय मेळाव्यात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महादेव पवार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देवून युवती प्रदेशध्यक्षा पदी निवड करण्यात आली.

कविता पाटील हिने तालुका जिल्हास्तरावर काम करतांना वृक्षारोपण, रक्तदान, अन्नदान, गरीब गरजूंसोबत सण उत्सव साजरे करण्यात नेहमी अग्रेसर आहे. या निवडीनंतर बोलताना त्यांनी म्हटले आहे की, जनसामान्यांसाठी आवाज उठवणे, महिला हक्कासाठी व त्यांच्या अन्यायाविरुद्ध नेहमी लढा देण्यासाठी तप्तर असेल.

Leave A Reply

Your email address will not be published.