मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
श्रीलंकेविरुद्धच्या 3 वनडे सामन्यांच्या सीरीजमधून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Bowler Jasprit Bumrah) टीम इंडियात (Team India) पुनरागमन करणार होता. पण आता अस होणार नाही. जसप्रीत बुमराह वनडे सीरीजमध्ये (ODI series) खेळणार नाही. जसप्रीत बुमराहला आधी वनडे सीरीजसाठी टीममध्ये स्थान मिळालं नव्हतं. पण 3 जानेवारीला जसप्रीत बुमराहचा वनडे स्क्वॉडमध्ये समावेश करण्यात आला होता . या निर्णयानंतर, अवघ्या 6 दिवसात जसप्रीत बुमराह वनडे सीरीजमध्ये खेळणार नसल्याच सांगण्यात आल आहे .जसप्रीत बुमराहच्या बाबतीत बीसीसीआयला (BCCI) अजिबात घाई करायची नाही. बुमराह टीमच्या दुसऱ्या खेळाडूंसोबत गुवाहाटीमध्ये पोहोचलेला नाही. गुवाहाटीमध्ये टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध पहिला वनडे सामना खेळणार आहे.
जसप्रीत बुमराह सप्टेंबर 2022 पासून क्रिकेटच्या मैदानापासून लांब आहे. पाठिच्या दुखण्यामुळे तो वर्ल्ड कपमध्येही खेळू शकला नाही. नॅशनल क्रिकेट अकादमीत (National Cricket Academy) त्याने आपल्या फिटनेसवर काम केलं. त्याला फिट घोषित करण्यात आलं. एनसीएने फिट घोषित केल्यानंतरच टीम इंडियाच्या निवडकर्त्यांनी श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सीरीजसाठी त्याचा टीममध्ये समावेश केला. पण आता अचानक बुमराहला आराम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जसप्रीत बुमराह टीममध्ये कधी परतणार?
जसप्रीत बुमराह न्यूझीलंड विरुद्ध वनडे आणि टी 20 सीरीजमध्ये खेळताना दिसू शकतो. ही सीरीज 18 जानेवारीपासून सुरु होणार आहे. त्यानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. जसप्रीत बुमराहचा फिटनेस टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचा आहे. यावर्षी टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. त्याशिवाय वनडे वर्ल्ड कपमध्येही खेळणार आहे. टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचली, तर बुमराहची भूमिका महत्त्वाची असेल.