रोटाव्हेटर चोरणारी टोळी भडगांव पोलीसांकडुन मुददेमालासह जेरबंद

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

घुसर्डी येथील शेतकऱ्याचा रोटाव्हेटर दि. १९/९/२०२३ रोजी चोरी झाल्याच्या तक्रारीवरुन भडगाव पोलीस स्टेशनला अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. गोपनीय बातमीदारांकडुन मिळालेल्या माहीतीच्या आधारे भडगांव तालुक्यातील निंभोरा येथील संशयीत प्रदिप गोपाल पाटील यास पोलीसांनी ताब्यात घेवून त्याचेकडेस रोटाव्हेटर बाबत चौकशी केली असता त्याचे साथीदार महेश छोटु पाटील रा. निंभोरा, शुभम ऊर्फ गणेश राजेंद्र महाजन, रा. कजगांव, चेतन साहेबराव शितोळे रा. भोरटेक ता. भडगावं यांनी सदरचा रोटाव्हेटर चोरल्याचे तपासामध्ये निषन्न झाले. सदर ४ ही आरोपींना ताब्यात घेवुन त्यांना गुन्हयाचे तपासकामी अटक करण्यात आली असुन न्यायालयाने आरोपींना ४ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. सुमारे १ लाख १० हजार रुपये किंमतीचा रोटाव्हेटर भडगाव पोलीसानी जप्त केला असून मा. सहायक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख साहेब, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, पो.ना नरेंद्र विसपुते, पो.कॉ.सुनिल राजपुत, पो.कॉ .प्रविण परदेशी, पो.कॉ.संदीप सोनवणे यांनी सदरची कारवाई केली असुन गुन्हयाचा पुढील तपास पो.हे.कॉ.संजय पाटील हे करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.