क्रिप्टोकरन्सी मध्ये फसवणुक करणारे महाठग भडगांव पोलीसांच्या जाळयात

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

क्रिप्टोकरन्सीच्या नावाखाली भडगांव तालुक्यातील नागरिकांची सुमारे २३ लाख ६० हजारांची फसवणुक झालेच्या तक्रारीवरुन भडगांव पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हयाचे तपासामध्ये सदरचे आरोपी हे संभाजीनगर (औरंगाबाद) येथे असल्याचे समजले. पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे यांनी पथकासह औरंगाबाद येथे जावुन क्रिप्टोकरन्सीच्या नावाखाली फसवणुक करणारे १) ज्ञानेश्वर योगराज देवरे वय ३९ ह.रा. फलॅट नं. ५, सारा- सार्थक अपार्टमेंट, वडगावं कोल्हाटी, बजाजनगर, वाळुंज, ता. गंगापुर, जि.औरंगाबाद,मुळ रा.महींदळे, ता. भडगांव जि.जळगांव २) राजु कौतीकराव शेरे, वय ३६ वर्षे, रा. भोंडवे पाटील स्कुल पाठीमागे, सहारा संगम इमारत, वडगाव कोल्हाटी, बजाजनगर, वाळुंज, ता. गंगापुर जि. औरंगाबाद. मुळ. रा. बोराखेडी बावरा, ता. देऊळगांव राजा, जि. बुलढाणा यांना पोलीसांनी ताब्यात घेवुन त्यांना गुन्हयात अटक केली आहे. सदर आरोपींना न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी दिली असून मा. सहायक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, पो. कॉ.सुनिल राजपुत, पो.कॉ.प्रविण परदेशी, पो.कॉ.संदीप सोनवणे यांनी सदरची कारवाई केली असुन गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे हे करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.