जळगावात 3 डिसेंबर रोजी लेवा पाटीदार समाजाचा विश्वस्तरीय वधू- वर महामेळावा…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

जळगाव येथील लेवा नवयुवक संघातर्फे दि 3 डिसेंबर रविवार 2023 रोजी विश्वस्तरीय विवाहेच्छुक वधु-वर परीचय महामेळावा जळगावात एकलव्य क्रिडा संकुल एम. जे कॉलेज येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी देश विदेशातील २६० नावनोंदणी केंद्राद्वारे संकलित विश्वस्तरीय विवाहेच्छूक वधु-वर सुचीचे प्रकाशन करण्यात येणार आहे. त्यासाठी नाव नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे. लेवा पाटीदार समाजातील विवाहेच्छुक वधू वरांसाठी विनामुल्य ऑनलाईन नोंदणी तसेच ऑफलाइन नोंदणी Leva sang Matrimony App वर वधु वर सुची साठी ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तरी लेवा पाटीदार समाजातील उपवर वधू-वरांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन लेवा नवयुवक संघातर्फे अध्यक्ष लक्ष्मीकांत तुकाराम चौधरी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी हिमालय ट्रैक्टर पार्टस्, २ नवी पेठ जळगाव येथे 8055567377, 80555 17377, 8275709077 वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.