साकळीचे सरपंच दिपक पाटलांचा प्रेरणादायी उपक्रम

यशस्वी विद्यार्थिनींचा घरी जाऊन केला सत्कार

0

मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क

नुकत्याच लागलेल्या बारावीच्या परिक्षेच्या निकालात साकळीच्या शारदा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयातील कला विभागाच्या विद्यार्थिनी कु.निशा बाळू चित्रे ही प्रथम क्रमांकाने, कु.काजल वासुदेव बडगुजर द्वितीय क्रमांकाने तसेच कु.प्रिया बाळू चित्रे ही तृतीय क्रमांक मिळवून चांगले यश संपादन करून उत्तीर्ण झालेल्या आहे. या तीनही विद्यार्थिनींची घरची परिस्थिती अतिशय प्रतिकूल असून या परिस्थितीवर मात करून या तीनही विद्यार्थ्यांनी भरघोस असे यश संपादन करून समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केलेला आहे.

या तीन विद्यार्थिनींपैकी कु.निशा व कु.प्रिया या दोघं सख्या बहिणी आहे. त्यांच्या घरची परिस्थिती अतिशय जेमतेम असून कुड- पत्राचा घरात रहिवास आहे. वडीलांचा पशुपालनाचा व्यवसाय असून या व्यवसायात त्या दोघं बहीणी वडिलांना मदत करतात. गुराढोरांना दररोजचा चारा- पाणी करून घरातील सर्वच कामे करून बारावीच्या परीक्षेत यश मिळविले आहे. तर कु.काजलनेही आपल्या कुटुंबाला घरातील सर्वच कामांमध्ये हातभार लावून यश मिळवले आहे.

अतिशय संघर्षातून – प्रतिकूल परिस्थितीतून या विद्यार्थिनींनी यश संपादन करणे ही गावाच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अतिशय कौतुकास्पद व अभिमानाची बाब आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करीत कठोर मेहनत करून यश संपादन केल्याबद्दल दि.२२ रोजी लोकनियुक्त सरपंच दिपक पाटील यांनी मित्रपरिवारासोबत या तीनही विद्यार्थिनींच्या घरी जाऊन विद्यार्थिनींचा व त्यांच्या आई-वडिलांचा सत्कार केला आणि त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या सत्कार प्रसंगी शिक्षणप्रेमी व्यक्तिमत्व सौरभ जैन, ग्रामपंचायतीचे वरिष्ठ लिपिक बाळकृष्ण तेली, नानाभाऊ मराठे, सलीम शेख, निलेश चित्रे, ज्ञानेश्वर मराठे उपस्थित होते. सरपंच दिपक पाटील यांनी विद्यार्थी हिताचा समाजप्रेरणादायी असा उपक्रम राबवल्याने त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.