उन्हाचा तडाखा !मुक्ताईनगरमध्ये १०० मेंढ्या दगावल्या

घटनास्थळी आ. चंद्रकांत पाटलांची अधिकाऱ्यांसमवेत भेट

0

मुक्ताईनगर , लोकशाही न्युज नेटवर्क 

काकोडा येथील रहिवाशी मेंढपाळ नामदेव चोपडे, भरत मदने, भोजू मदने, ज्ञानेश्वर मदने यांचे सर्वांचे मिळून जवळपास 90 ते 100 मेंढी पशुधन उष्माघातामुळे थेरोळा शिवारात मृत्यूमुखी पडले. या ठिकाणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी तहसीलदार, पशू वैद्यकीय अधिकारी यांची 8 ते 9 जणांची टीम, मंडळ अधिकारी, तलाठी यांना सोबत घेऊन भेट दिली.

या घटनेची माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्हिडिओ कॉल वरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री डॉ. राधाकृष्ण विखेपाटील, मंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना फोन द्वारे दिली.

शासन व प्रशासन सर्वोतोपरी आपणा सोबत आहे. हवी ती मदत आम्ही आपणास करणार या शब्दात मेंढपाळ बांधवांना दिलासा देत आमदार पाटील यांनी सर्वांना आदेश देत उभे राहून पंचनामे व पीएम करून घेतले.

यावेळी आमदार पाटील यांच्या समवेत अशोक कांडेलकर, तालुका प्रमुख नवनीत पाटील, विभाग प्रमुख विनोद पाटील, पंकज पांडव, रणजित गोयंका, सतिष नागरे, विनोद चौधरी, दिपक वाघ , दिलीप भोलानकर, अविनाश वाढे, पंकज धाबे, राहुल खिरळकर, पांडुरंग तांबे, योगेश मूलक, गणेश सोनवणे, विष्णु पाटील, शेख फारुख, जावेद खान परिसरातील शेतकरी व नागरिक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.