चाळीसगाव तालुक्यातून 14 वर्षीय मुलीला पळविले

0

चाळीसगाव ;- तालुक्यातील एका गावातून 14 वर्षाच्या मुलीला पळवून नेल्याची घटना 25 रोजी सकाळी नऊ ते रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली असून याप्रकरणी पीडीतेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध मेहुनबारे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की तालुक्यातील एका गावात हात मजुरी करणाऱ्या एका व्यक्तीची 14 वर्षीय मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून आमिष दाखवून पळवून नेल्याची घटना 25 रोजी घडली . तिचा शोध घेऊनही ती मिळून न आल्याने अखेर पित्याने पोलीस स्टेशनला धाव घेऊन मेहुणबारे येथे २८ रोजी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल योगेश मांडोळे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.